जिला

आखाड्याला आचनक लागलेल्या आगीत साडे सहा लाखांचे नुकसान; बैलजोडीचा होरपळून मृत्यू

 

अर्धापूर :- उध्दव सरोदे / अर्धापूर तालुक्यातील दाभड जिल्हा नांदेड शिवारातील शेतातील आखाड्याला दुपारी आचनक लागलेल्या आगीत साडे सहा लाखांचे नुकसान झाले आहे. या आगित दोन बैलांचा होरपळून मृत्यू झाला आहे तर कडब्याच्या दहा हजार पेंड्या जळून राख झाले आहे. ही आगीचे घटना रविवारी (ता सहा) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास झाली आहे. ही आगीची घटना शॉर्ट सर्कीटमुळे झाली असावी असा प्राथमिक अंदाज असून या घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे.

अर्धापूर नांदेड रस्त्यावर दाभड येथील शेतकरी शिवाजी महादजी टेकाळे यांचे दाभड शिवारातील गट क्रमांक २०१ मध्ये शेत आहे. या शेतात आखाडा असुन जणांवरांसाठी गोठा आहे. याच परिसरात जनावरांसाठी चारा रचुन ठेवण्यात आला होता. या परिसरातुन विज वितरण कंपनीच्या तारा गेल्या असुन या तारा लोंबकळल्या अवस्थेत आहेत. या आखाड्यात बैलांची जोडी बांधण्यात आती होती.

या आखाड्याला दुपारी आचनक आग लागली. या आगीला आटोक्यात आणण्यासाठी अर्धापूर नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. या अचानक लागलेल्या आगीत दहा हजार कडब्याच्या पेंड्या चाळीस लोखंडी पत्रे, तुषार संच, कडबाकुटी यंत्र, शेती उपयोगी अवजारे, विद्युत तार, मिटर, पाईप व ईतर संसार उपयोगी साहित्य आसे मिळून सुमारे साडे सहा लाखांचे नुकसान झाले आहे. या घटनेचा पंचनामा महसूल विभागाने के ला आहे. यावेळी मंडळी महेश वाकडे, तलाठी रवी पल्लेवाड, जमादार माधव पाटील, संदीप गायकवाड, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ इरफान पठाण आदी उपस्थित होते. घटनस्थळी शिवसेना तालुकाप्रमुख संतोष कपाटे, राजु पाटील टेकाळे, संजय पाटील टेकाळे, सामाजिक कार्यकर्ते गजानन मेटकर यांनी भेट देऊन पिडीत शेतकऱ्याला धिर दिता.

 

शेतकऱ्यावर दुहेरी संकट

शेतकरी शिवाजी टेकाळे हे दुधाचा जोडधंदा करतात. त्यांच्या आखाड्यावर गायी म्हशी आहेत. या पशुधनासाठी चाऱ्याचा साठा करून ठेवण्यात आला होता. शेतीच्या मशागतीच्या कामांसाठी बैल जोडी त्यांच्याकडे होती. आचनक तागलेल्या आगीत चारा जळून राख झाला आहे. तर बैलजोडीचा या आगित होरपळून जागीच मृत्यू झाला आहे. बैलांचा मृत्यू व चारा जळून राख झाल्याने शेतकऱ्यावर आसे दुहेरी संकट आले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *