जिला

किनवटला मोठी न्यायालयीन सुविधा; जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयासह वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

 

किनवट | प्रतिनिधी
राज्य मंत्रिमंडळाने किनवट येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय, सार्वजनिक अभियोक्ता (Public Prosecutor) कार्यालय तसेच वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय (Senior Division Civil Court) स्थापन करण्यास अधिकृत मंजुरी दिली आहे. यासोबतच विधी व न्याय विभागाने आवश्यक न्यायालयीन अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पदनिर्मितीसह संबंधित खर्चासाठी आवश्यक आर्थिक तरतूदही मंजूर केली आहे.

यापूर्वी किनवट व परिसरातील नागरिक, वकील आणि न्यायप्रविष्ट पक्षकारांना न्यायालयीन कामकाजासाठी नांदेड किंवा इतर दूरच्या ठिकाणी जावे लागत होते. त्यामुळे वेळ, पैसा आणि श्रम यांचा मोठा खर्च होत होता. ही अडचण लक्षात घेऊन आमदार भीमराव केराम यांनी किनवट येथे अतिरिक्त सत्र न्यायालय व वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय स्थापन करण्यासाठी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला.

या सातत्यपूर्ण प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून राज्य मंत्रिमंडळाने न्यायालयांच्या स्थापनेला हिरवा कंदील दिला आहे. या निर्णयामुळे किनवट व परिसरातील नागरिकांना न्याय मिळविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होणार असून स्थानिक वकील बांधवांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. न्यायालयांच्या मंजुरीची बातमी समोर येताच किनवट शहरासह परिसरातील नागरिक आणि वकील संघटनेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *