जिला

ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी कामांना गती द्या : सीईओ महेश पाटील

ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीवर सीईओ महेश पाटील यांचा भर

 

नांदेड, ३१ – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत विविध योजनांच्या प्रगतीचा आढावा गुरुवार दिनांक ३० जुलै रोजी जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रभारी प्रकल्प संचालक राजकुमार मुक्कावार यांची प्रमुख उपस्थिती होती.

बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी अभियानाची उद्दिष्टे वेळेत पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना दिल्या. लखपती दीदी स्लिप-बॅक एन्ट्री तातडीने पूर्ण करणे, तालुकास्तरीय कर्मचाऱ्यांनी बीएलबीसी बैठकीस नियमित उपस्थित राहणे, बचत गटांचे कर्ज प्रस्ताव वेळेत बँकांकडे सादर करणे तसेच पीएमईजीपी व सीएमईजीपी योजनांचे प्रस्ताव जिल्हा उद्योग केंद्राकडे तातडीने पाठविण्याचे निर्देश त्यांनी दिले.

याशिवाय सप्टेंबर २०२६ अखेरपर्यंत समूह बांधणीचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करणे, प्रभाग संघांचे प्रस्ताव पुढील आठवड्यापर्यंत धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडे सादर करून मंजुरी मिळविणे, समूह सदस्यांची ई-केवायसी आणि आधार पडताळणी निर्धारित मुदतीत पूर्ण करणे, तसेच RF, CIF, VRF, MKSP आणि OSF अंतर्गत निधी प्रस्ताव वेळेत जिल्हा कक्षाकडे सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

बैठकीस प्रभारी प्रकल्प संचालक राजकुमार मुक्कावार, जिल्हा अभियान व्यवस्थापक द्वारकादास राठोड, जिल्हा व्यवस्थापक गणेश कवडेवार, बालप्रसाद जंगिलवाड, माधव भिसे, तालुका अभियान व्यवस्थापक, तालुका व्यवस्थापक तसेच प्रभाग समन्वयक उपस्थित होते.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *