जिला
किनवट येथील पत्रकार सय्यद अमजद अली यांचे अपघातात दुःखद निधन

किनवट (प्रतिनिधी) किनवट शहरातील भूमिपुत्र सय्यद अमजद अली यांचं दिनांक 5-3- 2025 च्या पहाटे नांदेड अर्धापूर रोड दरम्यान अज्ञात वाहनाने धडक दिली.परिणामी त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भयानक होता की, अक्षरशा शरीर चेंदामेंदा झाले होते. परिणामी अंत्यविधी भोकर येतेच करावी लागली. याबद्दल किनवट शहरात व त्यांच्या मित्र परिवारात शोक कळा पसरली.
सविस्तर वृत्त असे की, सय्यद अमजद अली हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते होते. आणि काही दिवस ते पत्रकारितेमध्ये ही त्यांनी काम केले. बऱ्याच वर्षांपूर्वी ते किनवट सोडून भोकर येथे त्यांची सासरवाडी असल्याकारणाने तेथे ते आपल्या परिवारासोबत वास्तव्यास गेले होते. आज बुधवारच्या पहाटे ते भोकर ते अर्धापूर दरम्यान त्यांच्या व्यवसायानिमित्त जात असताना अचानक मोठ्या वाहनाने धडक दिली आणि ते जागीच चिरडल्या गेले.
परिणामी त्यांचा करून मृत्यू झाला. सदर बातमी किनवट शहरात पोहोचताच त्यांच्या मित्रपरिवार नातेवाईक यांना धक्का बसला. त्यांच्या पश्चात वडील, भाऊ, बहिणी, पत्नी व मुले असा मोठा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी भोकर येथेच करण्यात आला. अंत्यविधीला किनवट तालुक्यातून नातेवाईक, मित्रपरिवार,सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.



