महाराष्ट्रा

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे कोट्यावधींची मालमत्ता

उच्चपदस्थ अधिकाऱ्यावर झालेल्या या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ

मुंबईतील सांताक्रुझ येथे 22 कोटी रुपयांचा एक आलिशान फ्लॅट,पुण्यात तब्बल 25 कोटीचा आलिशान विला 

मुंबई: पुण्याचे माजी पोलीस आयुक्त आणि राज्याचे विद्यमान अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुप्ता यांच्या संपत्तीची गुप्त चौकशी पूर्ण केली असून, आता उघड चौकशीसाठी परवानगी मागितली आहे. उच्चपदस्थ आयपीएस अधिकाऱ्याची अशा प्रकारे चौकशी होण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असावी. त्यामुळे या प्रकरणाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते सुधीर आल्हाट यांनी केलेल्या तक्रारीवरून ही चौकशी सुरू करण्यात आली होती. गुप्त चौकशीत तथ्य आढळल्यानंतर आता एसीबीच्या महासंचालकांकडे उघड चौकशीची परवानगी मागण्यात आली आहे. या परवानगीनंतर अमिताभ गुप्ता यांच्यासमोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

आल्हाट यांच्या तक्रारीनुसार, अमिताभ गुप्ता यांच्याकडे कोट्यावधींची मालमत्ता आहे. पुण्यातील ॲमनोरा टाउनशिप मधील स्वीट वॉटर विला प्रकल्पात त्यांचा एक आलिशान विला आहे. या विलाची किंमत तब्बल 25 कोटी रुपये इतकी असल्याचा दावा आल्हाट यांनी केला आहे. याशिवाय, मुंबईतील सांताक्रुझ येथे त्यांचा 22 कोटी रुपयांचा एक आलिशान फ्लॅट असल्याचेही आल्हाट यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणात संपत्ती जमविल्यामुळे अमिताभ गुप्ता यांच्या उत्पन्नाच्या स्रोतावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एसीबीने केलेल्या गुप्त चौकशीत या संदर्भात काही महत्वाचे धागेदोरे सापडले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळेच आता एसीबीने उघड चौकशीसाठी परवानगी मागितली आहे.
गुप्ता यांच्या उघड चौकशीला लवकरात लवकर परवानगी मिळावी, अशी मागणी सुधीर आल्हाट यांनी केली आहे. तसेच, गुप्ता यांनी पुणे पोलीस आयुक्तपदाच्या कार्यकाळात दाखल केलेले काही गुन्हे आणि दिलेले रिव्हॉल्वर परवाने यांचीही चौकशी करण्याची मागणी आल्हाट यांनी केली आहे. त्यामुळे, गुप्ता यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

उच्चपदस्थ अधिकाऱ्यावर झालेल्या या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कसा होतो आणि त्याचा काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एसीबीच्या महासंचालकांनी उघड चौकशीला परवानगी दिल्यास अमिताभ गुप्ता यांना चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *