जिला
नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या पोलीस अधिकारी व अंमलदारांचा मा. डॉ. नीलाभ रोहन, पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते सत्कार व निरोप समारंभ,

नांदेड पोलीस दलात प्रदीर्घ काळ निष्कलंक व प्रामाणिक सेवा बजावून माहे ऑक्टोबर 2026 मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या 01 पोलीस अधिकारी आणि 04 पोलीस अंमलदारांचा सत्कार व निरोप समारंभ आज दिनांक 31/10/2026 रोजी ‘मंथन हॉत’, पोलीस अधीक्षक कार्यालय येथे संपन्न झाला. या सोहळ्यात नांदेडचे मा. डॉ. नीलाभ रोहन, पोलीस अधीक्षक, नांदेड यांच्या हस्ते सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदारांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आणि त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना मा. डॉ. नीलाभ रोहन, पोलीस अधीक्षक यांनी सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदारांचा पुष्पगुच्छ, शाल श्रीफळ व भेट वस्तु देवून सन्मान करून त्यांच्या पोलीस दलातील प्रदीर्घ सेवेबद्दल गौरव करण्यात आला. तसेच त्यांच्या पुढील आयुष्यासाठी निरोगी, आनंदी व सुखी जीवनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
पोलीस दलात सेवा बजावताना अधिकारी व अंमलदारांनी कायदा व सुव्यवस्था राखणे, नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी पार पाडणे, गुन्हे प्रतिबंध व तपास, वाहतूक नियमन तसेच विविध पोलीस कर्तव्ये पार पाडण्यासाठी योगदान दिले. त्यांच्या प्रदीर्घ सेवेमुळे पोलीस दलाच्या कार्यक्षमतेत मोलाची भर पडली असून, त्यांच्या सेवाभावी योगदानाबद्दल यावेळी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.



