शहर
महापालिकेच्या वतीने भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल आणि स्व.इंदिरा गांधी यांना विनम्र अभिवादन; अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतली ‘राष्ट्रीय एकतेची’ शपथ

नांदेड,दि.३१ ऑक्टोबर: अखंड भारताचे शिल्पकार, लोहपुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्यावतीने आज दि.३१ आँक्टोंबर २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजता जुना मोंढा टाँवर येथील त्यांच्या पुतळ्यास *महापौर सौ.कविता संतोष मुळे* यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तसेच भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पालिकेच्या मुख्य प्रशासकिय ईमारतीत सकाळी ९.०० वाजता त्यांच्या प्रतिमेस *महापौर सौ.कविता संतोष मुळे* यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी उपस्थित सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षा टिकवून ठेवण्यासाठी सामूहिक ‘राष्ट्रीय एकता शपथ’ घेतली. अंतर्गत सुरक्षेच्या बळकटीकरणासाठी आणि देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या दोन्ही महान नेत्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार, उपायुक्त अभिजीत वायकोस, उद्यान अधिक्षक तथा क्षेत्रिय अधिकारी डॉ.फरहतुल्ला बेग,यांच्यासह मनपाचे स.सदस्य,अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



