जिला

एजाज नादाफच्या या प्रवासाची कहाणी राज्य शैक्षिक संशोधन व प्रशिक्षण महारष्ट्र पुणे यांच्या माध्यमातून बाल भारती इयत्ता सहावी ब्रीज कोर्स मध्ये सामील

मजहब में से इंसानियत और खिदमत निकाल दी जाए तो सिर्फ इबादत रह जाती है। और महेज इबादत के लिए परवरदिगार के पास फरिश्तों की कोई कमी नहीं है।

काल एका न्युज चॅनलवर मराठवाड्याचा उल्लेख झाला, माझा त्या बातमीने लक्ष वेधलं. नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर तालुक्यातील पारडी गावात राहणाऱ्या एजाज नदाफ या शाळेकरी विद्यार्थ्याची शौर्यगाथा ऐकायला भेटली. घटना अशी की एजाज नदाफची नजर शेताकडे जातानाच्या रस्त्यावरील नदीच्या बाजू जमलेल्या जामावाकडे गेली ते धावत गेला. नदीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या चार मुली पाण्यात बुडत असलेला पाहून ते सवतःला रोकु शकला नाही. जीवाची परवाह न करता एकटा नदीत उडी मारली आणि त्या चार मुलीपैकी दोन मुलींना वाचविण्यात त्याला यश आले, काही प्रयत्ना नंतर दुसऱ्या दोन मुलींचे मृतदेह त्याला सापडले. एजाज ला दोन मुलींचे जीव वाचवले याचं आनंद झाला परंतु दोन जीव गेल्याचा दुःखातून तो आज ही सावरला नाही. एजाज म्हणतो की माझ्या मदतीला कोणी नदीत उतरले असते तर कदाचित दोन जीवांची हानी झाली नसती. दहावीत शिकणाऱ्या एजाज नदाफ च्या धाडसी कार्याचे कौतुक सर्व गावकऱ्यांनी केलं.एका मजूर कुटुंबातील गरीब एजाजच्या कार्याची दखल घेऊन माध्यमांनी त्यास दिल्ली पर्यंत नोंद घेण्यास भाग पाडले.2018 सालि भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बाल शौर्य पुरस्काराने दिल्ली येथे एजाज नदाफला सन्मानित करण्यात आले.
मी या घटनेबाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केले तेंव्हा अनेक वृत्तपत्रातील बातम्या मनाला वेदना देणाऱ्या होत्या शौर्य पुरस्कार प्राप्त एजाज कुटुंबियांवर हलाखीचे प्रस्थितीमुळे शिक्षणाचे खर्चाचे ओझे सहन होत नसल्याने मजुरी करावी लागत, परंतु त्याने शिकण्याची जिद्द सोडली नव्हती ते मजुरिकरून शिक्षण घेत होता. मध्यमावरील बातम्यांनी त्याच्या पाठीवर परत एकदा मायेचा हात फिविल्यासारखे झाले,त्या बातम्यांमुळे त्याचा शिक्षणाची जबाबदारी शाहीन ग्रुपने उचलली ते आज शिक्षण घेत आहे. एवढ्या प्रसंगाला तोंड देत एजाज नदाफ शिकत आहे, समाजासाठी काहीतरी करण्याचे त्याचे स्वप्न पाहणे साहजिक आहे ज्याने आपले विर्तेमुळे जगात आपल्या गावाची ओळख निर्माण केली त्याला एक हारलेल्या व्यक्तिमत्त्व म्हणून आपण वाचावे असे कोणालाही आवडणारे नाही. एजाज नादाफच्या या प्रवासाची कहाणी राज्य शैक्षिक संशोधन व प्रशिक्षण महारष्ट्र पुणे यांच्या माध्यमातून बाल भारती इयत्ता सहावी ब्रीज कोर्स मध्ये सामील केली आहे. मला खूप आनंद झाला. अनेकांच्या मदतीने त्याला कधी थांबवले नाही.चांगल्याच्या बाजूने उभे राहून त्याला आत्मविश्वास वाढविण्यासाठी प्रयत्न करणे ही समाजाची जबाबदारी समाज भक्कमपणे निभावली म्हणून एजाज आपल्या परस्थितीवर मात करू शकला असा समाज प्रत्येकाला हवसं आहे. आपल्या बाजूला असलेल्या जिल्ह्यातील व्यक्तीने आपले मराठवाड्याचे नाव इतिहासात नोंदविले त्याचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. आम्ही कधि ही एकमेकाना भेटलेलो नाही बोललो नाही काहीच संपर्क
 नसलेला हा एजाजला कधीतरी भेटुन त्याला सांगावे वाटते.
   
 यूं ही रगों में दौड़ते फिरने के हम नहीं कायल
जब आंख ही से ना टपका तो फिर वो लहू क्या
एजाज नदाफ
तुझे खूप खूप अभिनंदन

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *