काँग्रेस पक्ष हा रेल्वेसारखा आहे – खा. रविंद्र चव्हाण
दर्पण दिनानिमित्त खा. रविंद्र चव्हाण यांच्याकडून पत्रकारांचा सन्मान

काँग्रेसचे कंधार तालुकाध्यक्ष म्हणून संजय भोसीकर तर लोहा तालुकाध्यक्ष पदी मधुकर दिघे
नांदेड – काँग्रेस पक्ष हा रेल्वे गाडीसारखा आहे अनेक स्थानकावर रेल्वेमध्ये अनेक प्रवाशी चढतात, उतरतात पण रेल्वे चालण्याचे थांबत नाही त्याचप्रमाणे काँग्रेसमध्ये अनेक चढउतार आले आहेत काँग्रेसमध्ये अनेक पदाधिकारी येतात जातात पण काँग्रेस संपणार नाही, थांबणार नाही असे खा. रविंद्र चव्हाण म्हणाले.
पत्रकार दिनानिमित्त शहरातील सह्याद्री शासकीय विश्राम गृहामध्ये खा. रविंद्र चव्हाण यांच्याकडून शहरातील पत्रकरांचाच्या सन्मानाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी खा. प्रा.रविंद्र चव्हाण बोलत होते. यावेळी प्रभारी जिल्हाध्यक्ष माजी आमदार हनमंतराव पाटील बेटमोगरेकर, बी. आर.कदम, शहराध्यक्ष माजी महापौर अब्दुल सत्तार, प्रदेश सरचिटणीस केदार सोळंके, प्रदेश सचिव श्याम दरक, सुरेंद्र घोडजकर, डॉ. श्रावण रॅपनवाड, कार्याध्यक्ष बालाजी चव्हाण, महेश देशमुख शमीम अब्दुला, राजेश पावडे, डॉ. करुणा जमदाडे, सतिश देशमुख, राजन देशपांडे, बापुसाहेब पाटील यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.
पुढे बोलताना खा. रविंद्र चव्हाण म्हणाले की, महाविकास आघाडी सोबत राहून काँग्रेस स्थिनिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवणार आहे. काँग्रेस एक विचारधारा आहे काँग्रेसला मोठा जनाधार आहे, काँग्रेसच्या विचारसरणीला मानणारे जिल्ह्यात, राज्यात आणि देशात भरपूर लोक आहेत. आज महायुतीच सरकार आहे काही लोकांनी सत्ताधारी पक्षाकडे जावून काम करून घेण्यासाठी पक्ष बदलला असेल पण काँग्रेसला त्याचा काही फरक पडणार नाही. एक पदाधिकारी गेला की त्याठिकाणी दुसरा येऊन बसणार आहे आणि काँग्रेसचे काम करणार आहे काँग्रेसमधून काहीजण गेले म्हणून काँग्रेस संपणार नाही. उलट आगामी काळात काँग्रेसच जिल्ह्यात आणि राज्यात एक नंबरचा पक्ष राहील नांदेड जिल्ह्यात काँग्रेसला गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी आम्ही सर्वजण मेहनत करणार आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या महानगरपालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला विजयी करणार,
नांदेड मुंबई साठी नवीन रेल्वेची मागणी करणार, राज्याराणी एक्सप्रेसला दादरला थांबा द्यावा, नांदेड नागपूर नंदीग्राम सुरू व्हावी तसेच पुण्यासाठी नवीन रेल्वेची मागणी करणार, जिल्ह्यात औद्योगिक हब बनविण्यासाठी प्रयत्न करणार, केळीसाठी जिल्ह्यात कोल्ड स्टोरेज करण्यासाठी केंद्राकडे मागणी करणार. आगामी काळात पत्रकारांच्या सूचना घेणार आणि जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे खा. म्हणाले. पत्रकारांच्यावतीने ज्येष्ठ पत्रकार विजय जोशी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी उपस्थित पत्रकार मंडळीचा पत्रकार दिनानिमित्त सत्कार करण्यात आला. बापूसाहेब देशमुख यांनी आभार मानले.
काँग्रेसला कुठल्याच प्रकारची गळती लागली नाही – जिल्हाध्यक्ष बेटमोगरेकर
काँग्रेसला कुठल्याच प्रकारची गळती लागली नसून जनता आमच्या सोबत आहेत कालच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक ठिकाणी काँग्रेस दोन नंबरवर राहिला आहे. बहुसंख्य काँग्रेस सोबत आज लोक आहेत. जिल्ह्यात काँग्रेसचे मतदार काँग्रेसच्या सोबत आहेत इव्हीएम मुळे जिल्ह्यात उमेदवार निवडून आले आहेत. जनता काँग्रेस सोबत आहे आम्ही गावागावात जातो तालुक्याच्या पातळीवर जाऊन किंवा कुठल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जातो आजही जनता मध्ये आम्ही मतदान काँग्रेसला केले पण आमचं मतदान गेलं कुठे हा प्रश्न आम्हाला लोक विचारत आहेत याविरोधामध्ये काँग्रेसने आंदोलन छेडलं यास जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळाला असे काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष माजी आमदार हनुमंत बेटमोगरेकर म्हणाले.



