शहर

बौद्ध धम्माचे आचरण केल्यास मानवाचे कल्याण होते ,……डॉ.भदंत खेमधम्मो

३८ व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेला उत्साहात सुरुवात, देशविदेशातील भिक्खू संघाची उपस्थिती

 

 

अर्धापूर :- उध्दव सरोदे / मानवी जीवनात धम्माल खुप मोठे महत्त्व असुन प्रत्यकाने धम्माचे आचरण करणे आवश्यक आहे.धम्म्म ध्वजातील पाच रंग हे ज्ञान,शांती, प्रेम,त्याग यासह मानवी मुल्यांचे संदेश देणारे आहेत.धम्माच्या आचरणातून मनुष्य निष्कलंक होतो..भगवान‌ तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेला मार्गाने गेल्याने मानवी जीवनाची सार्थकता होते असे प्रतिपादन डॉ भदंत खेमधम्मो महाथेरो यांनी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेच्या सकाळच्या सत्रात झालेल्या धम्मदेसनेत सोमवारी (ता १३) केले.

महाविहार बावरीनगर दाभड (जिल्हा नांदेड) येथे ३८ व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेला देशविदेशातील भिक्खू संघाच्या उपस्थित सुरुवात झाली.सकाळच्या सत्रात त्रिरत्न वंदना परित्राण पाठ, महाबोधी वंदना झाली . श्रीलंकेतील माजी खासदार पुज्य भदंत आतुरलिय रतन थेरो यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण करण्यात आले.

या नंतर झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे अध्यक्ष पुज्य भदंत धम्म सेवक महास्थवीर हे होते यावेळी पुज्य भदंत डॉ उपयुक्त महाथेरो, पुज्य भिक्खू विनियबोधीप्रीय थेरो, भिक्खू रेवत थेरो, भिक्खू अश्विजीत थेरो, भिक्खू संघपाल थेरो, भिक्खू सुभुती, भिक्खू शिलरत्न थेरो, भिख्खू रेवत बोधी , भिक्खू बुध्दभुषण, भिक्खू अशवजित,श्रीलंकेतील भिक्खू नेलुवेल आनंद थेरो भिक्खू कोनगहदिनिये पलित थरो, भिक्खू उत्तलमे भिमसेन थेरो यांच्यासह देश विदेशातील भिक्खू संघाची उपस्थिती होती.संयोजक डॉ एस पी गायकवाड यांच्या वतीने उपस्थित भिख्खू संघाचे स्वागत करण्यात आले.या वेळी धम्म ध्वज वंदना,त्रिशरण पंचशीलाचे पठण करण्यात आले.तर सेवा निवृत्त पोलिस अधिकाऱ्यांनी मानवंदना दिली.

या वेळी धम्म देसना देताना डॉ भदंत खेमधम्मो महाथेरो म्हणाले की,मानवाने निष्कलंक राहावे.धम्मतील तत्वांचे पालन करावे. धम्माचे काम करावे असे आवाहन त्यांनी केले.त्यांनी धम्म ध्वजातील पाच रंगाची माहिती सांगितली.धम्म परिषदेच्या निमित्ताने नांदेड शहरातील प्रमुख मार्गावरून धम्मयान संचलन करण्यात आले.या धम्म परिषदेचे सायंकाळी लाखो उपासकांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले.तसेच संबोधी स्मरणिकेचे प्रकाशन पुज्य भिक्खुंच्या हस्ते करण्यात आले.

या धम्म परिषदेतचे सुत्रसंचलन प्राध्यापक मिलिंद भालेराव यांनी केले. यावेळी प्रा बाबाराव वाघमारे, अशोक गोडबोले,एस टी पंडित, नारायण सरोदे, डी पी गायकवाड, डी .डी .भालेराव, गंगाधर सुर्यवंशी ,पत्रकार उध्दव सरोदे, ईश्वर सावंत, सुभाष रावणगावकर ,इंद्रजित नरवाडे, रमेश धुतमल, बाबुराव इंगोले, शिवाजी सावंत, किशनराव रावणगावकर,राजेश लोणे ,तोलाजी अटकोरे , शैलेंद्र गायकवाड,अनिल उबाळे,प्रशीक गायकवाड यांच्या सह बौद्ध उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *