सोनखेड येथे तिसरे राज्यस्तरीय जनहित ग्रामीण साहित्य संमेलन
आ.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते उद्घाटन : आ.हेमंत पाटील, आ.आनंदराव पाटील बोंढारकर यांची विशेष उपस्थिती

प्रतिनिधी, नांदेड / महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई आणि राजर्षी शाहू महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान, जवळा (दे) ता.लोहा यांच्या संयुक्त विद्यमाने सोनखेड ता.लोहा येथे तिसरे राज्यस्तरीय जनहित ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न होणार आहे. या साहित्य संमेलनास उद्घाटक म्हणून लोहा- कंधार विधानसभेचे आ.प्रतापराव पाटील चिखलीकर, विषेश निमंत्रित म्हणून कॅबिनेट मंत्री दर्जा प्राप्त आ.हेमंत पाटील आणि नांदेड दक्षिणचे आ.आनंदराव पाटील बोंढारकर, तर स्वागताध्यक्ष म्हणून सोनखेडचे उपसरपंच सुनील साहेबराव देशमुख मोरे हे उपस्थित राहणार आहेत. या साहित्य संमेलनामध्ये ग्रंथदिंडी, नाणे प्रदर्शन, परिसंवाद, कथाकथन, प्रगट मुलाखत, गझल संध्या, पुरस्कार वितरण, कवी संमेलन आदी भरगच्च कार्यक्रमांची रसिकांना मेजवानी मिळणार आहे.
साहित्यिक, विचारवंत, लेखक, कवी यांनी गावाकडे चलावे, ग्रामीण जनतेला मिळणाऱ्या गावामध्ये मिळणाऱ्या मूलभूत सुविधा, पाणी, रस्ते, शाळा, सांडपाण्याची व्यवस्था आदी प्रत्यक्ष बघावे, ग्रामीण जनतेचे जीवनमान, गावातील सामाजिक परिस्थिती कशा प्रकारची आहे हे जवळून बघावे आणि संवेदनशीलतेने त्यांनी साहित्य लिहावं. तसेच शासकीय अधिकारी कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी यांनी सुद्धा साहित्य संमेलनाच्या माध्यमातून गावांमध्ये यावे आणि गावाची परिस्थिती जवळून बघावी आणि ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई आणि राजर्षी शाहू महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान जवळा (दे) ता.लोहा यांच्या संयुक्त विद्यमाने सोनखेड या.
लोहा येथे तिसरे राज्यस्तरीय जनहित ग्रामीण साहित्य संमेलन सोमवारी, २७ जानेवारी रोजी आयोजित केले असून, अस्सल ग्रामीण कथाकार राजेंद्र गहाळ या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत. या साहित्य संमेलनास उद्घाटक म्हणून माजी खासदार आणि लोहा-कंधार विधानसभेचे आ.प्रतापराव पाटील चिखलीकर, विषेश निमंत्रित म्हणून कॅबिनेट दर्जा प्राप्त आ.हेमंत पाटील आणि नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील बोंढारकर, नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, परभणीचे मा.आ.विजयराव गव्हाणे, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबईचे सदस्य श्रीधर नांदेडकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विनय गिरडे पाटील, सोनखेडच्या सरपंच सौ.संगिता इंगळे, तर स्वागताध्यक्ष म्हणून सोनखेडचे उपसरपंच सुनील साहेबराव देशमुख मोरे हे उपस्थित राहणार आहेत.
सकाळी ९ वाजता ग्रंथ दिंडी निघणार असून या ग्रंथ दिंडीचे पूजन उपसरपंच सुनील साहेबराव देशमुख मोरे यांचे हस्ते होणार आहे. त्यानंतर संतोष तळेगावे यांच्या दुर्मिळ नाने आणि नांदेड जिल्ह्यातील साहित्यातील माणिक मोती या चित्र प्रदर्शनाचे दत्ता डांगे आणि निर्मलकुमार सूर्यवंशी यांच्या हस्ते होणार आहे. सकाळी १० वाजता लोहा-कंधार विधानसभेचे आ.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून सुशिल गवळी सहाय्यक कक्ष अधिकारी मंत्रालय, मुंबई, भुजंग गोडबोले पोलीस निरिक्षक, नांदेड, ज्येष्ठ साहित्यिक देविदास फुलारी, ज्येष्ठ साहित्यिक दिगंबर कदम, शिवानंद मिनगिरे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, प्रा.महेश मोरे पूर्व संमेलन अध्यक्ष, विठ्ठल परळीकर तहसिलदार लोहा, राजू येवले पाटील जानापुरीकर, सत्येंद्र विरेंद्र जिल्हा समाज कल्याण अधिकारी जि.प.नांदेड, पांडुरंग माने सहाय्यक पोलीस निरिक्षक, सोनखेड, सौ.वैशाली कांबळे पोलीस उपनिरिक्षक सोनखेड, साहेबराव गायकवाड जिल्हा सरचिटणीस भाजपा, संजय कदम से.नि.कॅप्टन, शुभम पांचाळ युवा पत्रकार म्हणून साहित्यिक देविदास फुलारी, दिगंबर कदम आदी उपस्थित राहणार आहेत.
या साहित्य संमेलनामध्ये बालाजी इबितदार यांना जिवन गौरव, द.भ.प.राम भारती महाराज अध्यात्मिक, प्राचार्य डी.पी. कदम शिक्षणरत्न, डॉ.ललिता शिंदे साहित्यरत्न, ह.भ.प.अरविंद महाराज सोनखेडकर अध्यात्मिक, राजेश्वर कांबळे दर्पण पत्रकारिता, प्रा.महेश कुडलीकर साहित्यरत्न, डॉ.कृष्णराव पाटील जरोडेकर सद्भावना, सी.आर.पंडित कथारत्न, भगवान इंगोले कृषीरत्न, अशोक कुरुडे साहित्यरत्न कवि आत्माराम राजेगोरे काव्य, बाळासाहेब खिल्लारे समाजभुषण, व्यंकटेश काटकर साहित्य साहित्य आदी विविध क्षेत्रातील यशस्वी व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय जनहित पुरस्कार २०२५ देण्यात येणार आहेत.
दुपारी १२ ते १ या वेळेत प्रमाण मराठी भाषेने मायबोलींना सामावून घ्यावे या विषयावर परिसंवाद होणार असून या परिसंवादाचे अध्यक्ष प्रा.डॉ.संजय जगताप असून प्रा.डॉ. नानासाहेब सूर्यवंशी आणि प्रा.राजेश ढवळे यांचा सहभाग राहणार आहे. दुपारी २ ते ४ या कालावधीमध्ये कथाकथन होणार असून प्रा.डॉ.शंकर विभुते हे या कथाकथनचे अध्यक्ष असून प्रा.डॉ.वैजनाथ अमुलवाड, पत्रकार राम तरटे आणि भारत दाढेल सहभागी होणार आहेत. त्यानंतर ४ ते रात्री ६ वाजेपर्यंत बहारदार कवी संमेलन होणार असून या कविसंमेलनाचे अध्यक्ष शंकर वाडेवाले राहणार असून सहभागी कवी तुकाराम खिल्लारे, अशोक घोरबांड, अमृत तेलंग, श्रीनिवास मस्के, पंडित पाटील बेळीकर, विठ्ठल सातपुते, रोहिणी पांडे, रुचिरा बेटकर, बबन आव्हाड, अरविंद सगर, शंकर राठोड, बालाजी पेठेकर, सौ. अंजली मुनेश्वर, प्रा.गजानन मोरे टेळकीकर, रामदास कांबळे, ॲड.शंकर कदम, प्रा.राम कठारे धनेगावकर, दत्ता वालेकर, गणपत माखणे, नागनाथ बडे यांसह अनेक कवी, कवित्री सहभागी होणार आहेत.
या साहित्य संमेलनामध्ये परिसरातील साहित्यप्रेमी रसिक, प्रेक्षक महिला, पुरुषांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सोनखेडचे उपसरपंच तथा स्वागताध्यक्ष सुनील देशम



