जिला
प्रकाश बोकन यांचे दुःखद निधन

अर्धापूर :- उध्दव सरोदे / नांदेड शहरातील संघसेन नगर ईतवारा येथील बौद्ध उपासक प्रकाश बाबुराव बोकन यांचे दि.२० जानेवारी सोमवार रोजी सकाळी ३ उपचारा दरम्यान रुग्णालयात दुःखद निधन झाले. ते ५२ वर्षाचे होते. त्यांच्या पार्थिवावर दि. २० जानेवारी दुपारी २ वाजता नांदेड येथील मरघाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.कालवश प्रकाश बोकन यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, दोन वहिनी, दोन मुले, एक मुलगी, नात-नातु, असा मोठा परिवार आहे. त्यांच्या दुःखद निधनाची बातमी कळताच शोककळा पसरली. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.



