एज्युव्हिजन इंग्रजी शाळेत २७ जानेवारीला वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा
प्रमुख उपस्थिती सौ.कल्पना खानसोळे (नांदेडची आत्याबाई फेम)

अर्धापूर :- उध्दव सरोदे / शहरात नव्याने शैक्षणिक क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या कै. शंकरअप्पा रावते बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित एज्युव्हिजन इंग्रजी शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा सोमवार दि.२७ रोजी सायंकाळी ५ वाजता माँ जिजाऊ मंगल कार्यालय,तामसा रोड अर्धापूर येथे आयोजित करण्यात आला आहे.
चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी एज्युव्हिजन इंग्रजी शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा आयोजित केलेला आहे.या स्नेहसंमेलन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य धर्मराज देशमुख हे राहणार आहेत तर स्नेहसंमेलनाचे उद्घाटन भाजपाचे जिल्हाध्यक्ष अॅड. किशोर देशमुख,तहसीलदार रेणूकादास देवणीकर,सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू क-हाळे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे नांदेड जिल्हाप्रमुख बबनराव बारसे,नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय देशमुख लहानकर, नगराध्यक्ष छत्रपती कानोडे, उप नगराध्यक्ष प्र.मुसवीर खतिब,पप्पू पाटील कोंढेकर,हनुमंत राजेगोरे, कृष्णाजी देशमुख,
नगरसेवक प्र. प्रविण देशमुख,राजु शेटे,प्रल्हाद माटे,व्यंकटी राऊत,बाबुराव लंगडे, पंडितराव लंगडे,डॉ.विशाल लंगडे, सोनाजी सरोदे,शेख जाकेर,विराज देशमुख,डॉ.लक्ष्मणराव इंगोले,संतोष कपाटे,शशिकांत क्षिरसागर,उध्दवराव राजेगोरे,संतोष कल्याणकर,सुनिलराव वानखेडे,अभिषेक गुरखेल,तुकाराम साखरे,नवनाथ बारसे,शिवराज जाधव,अर्धापूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष गुणवंत विरकर, तालुकाध्यक्ष गोविंद टेकाळे,फिरदौस हुसैनी,आनंद सिनगारे,योगेश हाळदे, सचिन येवले,संदिप राऊत,काजी सल्लाउद्दीन,मिर्झा फसिउल्ला बेग, ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मीकांत मुळे, निळकंठ मदने,ओमप्रकाश पत्रे,
नागोराव भांगे,उध्दवराव सरोदे, सखाराम क्षिरसागर,रामराव भालेराव, सुभाष लोणे,उदयकुमार गुंजकर,शेख साबेर,अॅड.गौरव सरोदे,मनोज मनपुर्वे,सामाजिक कार्यकर्ते सचिन देशमुख,अनिकेत आवरदे यांची उपस्थिती राहणार आहे.
एज्युव्हिजन इंग्रजी शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन सोहळ्याच्या कार्यक्रमास शैक्षणिक प्रेमी नागरिक,विद्यार्थी, पालक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कै.शंकरअप्पा रावते बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती.रेखाताई रावते, प्राचार्या सौ.प्रिया रावते,संचालक प्रविण रावते व समस्त एज्युव्हिजन परिवार यांनी केले आहे.



