नगरसूल–तारूर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामामुळे काही गाड्या रद्द

तर काही गाड्या अंशतः रद्द आणि काही उशिरा धावणार
नगरसूल–तारूर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामामध्ये विद्युतीकरण व सिग्नलिंगची कामेही करण्यात येणार आहेत. या कामासाठी 25 नोव्हेंबर 2026 ते 10 डिसेंबर 2026 या कालावधीत एकूण 16 दिवसांचा ब्लॉक मंजूर करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने काही गाड्या रद्द तर काही गाड्यांच्या फेऱ्यात बदल करण्यात येत आहे
खालील प्रवासी गाड्या रद्द करण्यात येतील:
गाडी क्रमांक 77619 जालना–नगरसूल पॅसेंजर – दिनांक 1, 3, 7, 8 व 10 डिसेंबर 2026 रोजीच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. (एकूण 5 फेऱ्या)
गाडी क्रमांक 77620 नगरसूल –जालना पॅसेंजर – दिनांक 1, 3, 7, 8 व 10 डिसेंबर 2026 रोजीच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. (एकूण 5 फेऱ्या)
गाडी क्रमांक 77621 जालना–नगरसूल डेमू – दिनांक 2, 4, 5, 6 व 9 डिसेंबर 2026 रोजीच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. (एकूण 5 फेऱ्या)
गाडी क्रमांक 77622 नगरसूल–जालना डेमू – दिनांक 2, 4, 5, 6 व 9 डिसेंबर 2026 रोजीच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. (एकूण 5 फेऱ्या)
काही गाड्या अंशतः रद्द
खालील गाड्यांच्या फेऱ्या नगरसूल–रोटेगाव किंवा रोटेगाव–नगरसूल दरम्यान अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत :
गाडी क्रमांक 16003 चेन्नई–नगरसूल एक्स्प्रेस – दिनांक 6 डिसेंबर 2026 रोजी रोटेगाव–नगरसूल दरम्यान अंशतः रद्द करण्यात येत आहे. (एकूण 1 फेरी)
गाडी क्रमांक 16004 नगरसूल–चेन्नई एक्स्प्रेस – दिनांक 7 डिसेंबर 2026 रोजी नगरसूल–रोटेगाव दरम्यान अंशतः रद्द करण्यात येत आहे. (एकूण 1 फेरी)
गाडी क्रमांक 17231 नरसापूर –नगरसूल एक्स्प्रेस – दिनांक 4 व 6 डिसेंबर 2026 रोजी रोटेगाव–नगरसूल दरम्यान अंशतः रद्द करण्यात येत आहे. (एकूण 2 फेऱ्या)
गाडी क्रमांक 17232 नगरसूल–नरसापूर एक्स्प्रेस – दिनांक 5 व 7 डिसेंबर 2026 रोजी नगरसूल–रोटेगाव दरम्यान अंशतः रद्द करण्यात येत आहे. (एकूण 2 फेऱ्या)
गाडी क्रमांक 12787 नरसापूर–नगरसूल एक्स्प्रेस – दिनांक 30.11.26, 01.12.26, 02.12.26, 03.12.26, 05.12.25, 07.12.26, 08.12.26, 09.12.26 रोजीच्या फेऱ्या रोटेगाव–नगरसूल दरम्यान अंशतः रद्द करण्यात येत आहे. (एकूण 8 फेऱ्या)
गाडी क्रमांक 12788 नगरसूल–नरसापूर एक्स्प्रेस – दिनांक 01.12.26, 02.12.26, 03.12.26, 04.12.26 06.12.25, 08.12.26, 09.12.26, 10.12.26 रोजीच्या फेऱ्या नगरसूल–रोटेगाव दरम्यान अंशतः रद्द करण्यात येत आहे. (एकूण 8 फेऱ्या)
गाडी क्रमांक 17687 मनमाड–धर्माबाद एक्स्प्रेस – दिनांक 1 ते 10 डिसेंबर 2026 रोजीच्या फेऱ्या मनमाड –लासूर दरम्यान अंशतः रद्द करण्यात येत आहे.(एकूण 10 फेऱ्या)
गाडी क्रमांक 17688 धर्माबाद–मनमाड एक्स्प्रेस –दिनांक 1 ते 10 डिसेंबर 2026 रोजीच्या फेऱ्या लासूर – मनमाड दरम्यान अंशतः रद्द करण्यात येत आहे.(एकूण 10 फेऱ्या)
गाडी क्रमांक 57652 मनमाड–नांदेड पॅसेंजर – दिनांक 9 व 10 डिसेंबर 2026 रोजीच्या फेऱ्या मनमाड –लासूर दरम्यान अंशतः रद्द करण्यात येत आहे.(एकूण 2 फेऱ्या)
गाडी क्रमांक 57651 नांदेड–मनमाड पॅसेंजर – दिनांक 8 व 9 डिसेंबर 2026 रोजीच्या फेऱ्या लासूर – मनमाड दरम्यान अंशतः रद्द करण्यात येत आहे.(एकूण 2 फेऱ्या)
गाडी क्रमांक 17661 काचीगुडा–नगरसूल एक्स्प्रेस – दिनांक 3 ते 9 डिसेंबर 2026 रोजीच्या फेऱ्या रोटेगाव–नगरसूल दरम्यान अंशतः रद्द करण्यात येत आहे. (एकूण 7 फेऱ्या)
गाडी क्रमांक 17662 नगरसूल–काचीगुडा एक्स्प्रेस – दिनांक 4 ते 10 डिसेंबर 2026 रोजीच्या फेऱ्या नगरसूल–रोटेगाव दरम्यान अंशतः रद्द करण्यात येत आहे. (एकूण 7 फेऱ्या)
काही गाड्या उशिरा धावतील :
गाडी क्रमांक 12753 नांदेड–निझामुद्दीन एक्स्प्रेस – 1 व 8 डिसेंबर 2026 रोजी 80 मिनिटांनी उशिराने धावतील. (एकूण 2 फेऱ्या)
गाडी क्रमांक 12715 नांदेड–अमृतसर एक्स्प्रेस – 1 ते 10 डिसेंबर 2026 दरम्यान 70 मिनिटांनी उशिराने धावतील. (एकूण 10 फेऱ्या)
गाडी क्रमांक 17618 नांदेड–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस – 1 ते 10 डिसेंबर 2026 दरम्यान 70 मिनिटांनी उशिराने धावतील. (एकूण 10 फेऱ्या)
रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणामुळे भविष्यात रेल्वे परिचालनाची क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. प्रवाशांनी वरील बदलांची नोंद घेऊन आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे रेल्वे प्रशासन आवाहन करीत आहे.



