जिला

जे पत्रकार खा.अशोक चव्हाण सोबत राहतील त्यांनाच जाहिरात मिळेल………

आज अर्धापूर येथे झालेल्या भव्य रोजगार मेळाव्याच्या आलेल्या वर्तमानपत्रातील जाहिरातीतून झाले सिध्द.

 

अर्धापूर व नांदेड प्रतिनिधी – ता.२२ रोजी अर्धापूर येथील शंकरराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्रांगणात खा.अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनात व आ.श्रीजया चव्हाण यांच्या संकल्पनेतून झालेल्या भव्य रोजगार मेळाव्याबाबद गेली २ महिन्यापासून तयारी, जनजागृती व प्रसिद्धी करण्यात आल्याने याबाबत तालुक्यातील व जिल्ह्यातील सर्व पत्रकारांना आनंद झाला त्याचे कारण कि,एवढा मोठा कार्यक्रम म्हटले की पत्रकारांना जाहिरात १००% मिळणार कारण पत्रकारांना पेपर मधील छापलेल्या बातमीचे नव्हे तर जाहिरातीतून पैसे मिळतात.

याबाबद ता.२१ पर्यंत ज्यांच्याकडे जाहिरात देण्याचा पदभार आहे,त्या सर्वांसोबत वेळोवेळी बोलणे केले तर त्यांच्या कडून नियमित उत्तरे आली कि, जाहिरात देण्याचे काम चालू आहे, लवकरच तूम्हाला देवू ,साहेबांशी बोलणे चालू आहे, बोलणे झाले कि देतो, साहेबांन सोबत बोलणे झाले नाही अशी शेवट पर्यंत उत्तरे आली, परंतु शेवटी जे पत्रकार खा.अशोक चव्हाण सोबत,त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यां सोबत राहतील, त्यांच्या सारख्या बातम्या लावतील त्यांनाच जाहिरात मिळेल याचा पुर्णपणे प्रत्यय आला व कालच्या मोजक्या वर्तमानपत्रा मध्ये जे कि पक्षाचे आहेत,कार्यकर्ते आहेत,त्यांच्या सोबतचे आहेत अशांनाच जाहिराती दिल्या व ईतर पत्रकारांवर अन्याय करून त्याची निराशा करून अपमान केलेला आहे.

असाच अपमान खा.अशोक चव्हाण यांनी भोकर येथे पाणीपुरवठा बैठकीमध्ये पत्रकारांना जाहीरपणे माईक मध्ये बोलून बैठकी मधून बाहेर काढून देवून अपमानित केले आहे.म्हणजे यांना महत्त्वाच्या बातम्या द्यायच्या व घ्यायच्या असतील तेव्हा पत्रकारांची अगोदर आवर्जून आठवण येते,मग जाहिरात देण्याबाबद असा दुजाभाव का? या विषयी संपूर्ण जिल्हा भरातून पत्रकारांचा अन्याया बद्दल संताप व्यक्त होत आहे.यावरून परत एकदा सिद्ध झाले कि,यांना फक्त पैशातून सत्ता व सत्तेतून पैसा याची मुजोरी असून जनता व पत्रकार यांच्या बद्दल अन्याय होवो कि अपमान काही देणे घेणे नाही.

पण खरे तर असे आहे की,देशाचा चौथा आधारस्तंभ असलेला पत्रकार हा कोणत्याही राजकीय पक्षाचा व नेत्याचा बांधिल किंवा गूलाम नसतो हे यांना माहित असून सुद्धा यांनी जे पत्रकार खा.अशोक चव्हाण सोबत,त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यां सोबत राहतील, त्यांच्या सारख्या बातम्या लावतील त्यांनाच कालच्या कार्यक्रमाच्या जाहिराती दिल्याने पत्रकार व जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त होत असून या प्रकाराचा पत्रकारां मार्फत जाहीर निषेध करण्यात येत आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *