जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामसंघांसाठी संधी अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड, 24- जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन अंतर्गत ग्रामीण भागात जलजीवन मिशनची अंमलबजावणी सुरू आहे. या अंतर्गत 1 हजार 115 गावांमध्ये सक्षम ग्रामसंघ निवडण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. निवड झालेल्या ग्रामसंघांना गावातील पाणीपुरवठा व्यवस्थापन, देखभाल-दुरुस्ती व समुदाय सहभागासाठी जबाबदारी देण्यात येईल. त्यांना दरमहा 2 हजार रुपये मानधन मिळेल.
इच्छुक ग्रामसंघांनी अर्ज जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयात सादर करावेत. अर्जांची तपासणी होऊन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली निवड केली जाईल. निवड झालेल्या ग्रामसंघांना विशेष प्रशिक्षण दिले जाईल. तरी ग्रामसंघांनी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले व उपमुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ यांनी केले आहे.



