जिला

राज्यमंत्री यांना तृतीयपंथी कल्याण मंडळ पुनर्गठन साठी निवेदन

 

आज, महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि संस्थांच्या प्रतिनिधींनी तृतीयपंथी मंडळ पुन्हा स्थापनेसाठी केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहळ आणि महाराष्ट्र राज्य मंत्री माधुरीताई मिसाळ यांना हे निवेदन दिले. दि. २३ फेब्रुवारी २०२५ रोजी पुणे येथे दोन्ही मंत्रांचे जनता दरबार मध्ये सदर निवेदन दिले आणि यामध्ये सामाजिक कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण उपस्थिती होती.
निवेदन देताना, तृतीयपंथी सामाजिक कार्यकर्ता डॉ. सान्वी जेठवानी (अध्यक्ष, सप्तारंग सेवाभावी संस्था, नांदेड), मयुरी आळवेकर (अध्यक्ष, मैत्री फाउंडेशन, कोल्हापूर) आणि बार्शीचे सामाजिक कार्यकर्ता सचिन वायकुळे उपस्थित होते. या निवेदनात आर्थिक, रोजगार, विविध पैलूंच्या तत्त्वज्ञान, समाजकल्याण आणि विविध सामाजिक सेवांमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने तृतीयपंथी कल्याण मंडळाची पुनर्स्थापना करण्याची मागणी करण्यात आली.
 या प्रस्तावावर मंत्री मंडळात चर्चा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आणि भविष्यात यासाठी योग्य पावले उचलली जातील, असे सांगितले. हे मंडळ स्थापन केल्याने समाजातील विविध घटकांचे कल्याण होईल आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा होईल, असे विश्वास निवेदन देणाऱ्यांनी व्यक्त केला.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *