मुदखेड येथे तिसऱ्या बौद्ध धम्म परिषदे निमित्त पत्रकार परिषद संपन्न

मुदखेड ता. प्र. अखिल भारतीय भव्य बुद्ध धम्म परिषदेचे दि. ०२ मार्च रोजी आयोजन करण्यात आले असून सकाळी ९:२० वाजता समता सैनिक दल पथसंचलन तसेच मोफत आरोग्य शिबीर, प्रा नितीश कऱ्हाळे, कवी नितीन चंदनशिवे, मार्शल सुनील सारीपुत्त यांचे व्याख्यान होणार असून या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आव्हान नालंदा चॅरिटेबल ट्रस्ट, बोद्ध भूमी प्रशिक्षण केंद्र धम्म परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
दिसणारी आज समाजामध्ये व्यसनाधीनता वाढत आहे अकुशल संस्कार दूर सारून कुशल संस्कार मनावर व्हावे बहुजन समाजातील व्यसनाधीनता अज्ञान अंधकार दारिद्रता दूर व्हावी आणि माणूस म्हणून सर्वांना जीवन जगता यावे याकरिता तिसऱ्या धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. असे मनोगत प्रा. डॉ. एस सत्यापाल महाथेरो मुळावा यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले.
नालंदा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने गेल्या तीन वर्ष्यापासून अखिल भारतीय बोद्ध धम्म परिषदेचे आयोजन केले जात आहे. या वर्षी बोद्ध भूमी प्रशिक्षण केंद्र महात्मा फुले चौक अशोका नगर मुदखेड दि. २ मार्च रोजी आयोजन केले आहे. अखिल भारतीय बोद्ध महासभा कार्याध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. मोफत सर्व रोगनिदान आयोजित आरोग्य शिबिरात रुग्णांची तपासणी केली जाणार आहे.प्रख्यात व्याख्याते प्रा नितीश कऱ्हाळे, कवी नितीन चंदनशिवे, मार्शल सुनील सारीपुत्त हे आपल्या खरमरीत शैलीत मार्गदर्शन करणार आहे.
बोद्ध उपासक उपासिका यांना बोद्ध धम्म परिषदेत धम्मदेशना भिक्खू डॉ. खेमधाममो महाथेरो, भिक्खू डॉ. उपगुप्त महाथेरो, भिक्खू डॉ. प्रा. एम. सत्यपाल महाथेरो, भिक्खू डॉ. इंदवंश महाथेरो, भिक्खू ज्ञानरक्षित थेरो, भिक्खू पाय्यारत्न थेरो, भिक्खू पाय्यबोधी थेरो, भिक्खू शिलरत्न थेरो, भिक्खू धम्मशील थेरो, भिक्खू पाय्यानंद थेरो, भिक्खू संघपाल थेरो, भिक्खू सुभूती थेरो, भिक्खू अश्वजित थेरो, भिक्खू रेवातबोधी,भिकखु बोद्धीधम्मा,भिक्खू बुद्धभूषण,भिक्खू पाय्यावर्धन,भिक्खू पाय्यवंश, भिक्खू गगनबोधी, भन्ते पाय्यदीप, भन्ते पाय्यासार करणार आहेत. बोद्ध धम्म परिषदेचा लाभ घ्यावा असे आव्हान डॉ. उपगुप्त महाथेरो पुर्णा,प्रा. डॉ. सत्यपाल महाथेरो, भिक्खू शिलरत्न थेरो, भिक्खू गगनबोधी, यांनी केले.
या कार्यकमाचे आयोजन नालंदा चॅरिटेबल ट्रस्ट, बोद्ध भुमीप्रशिक्षण केंद्र मुदखेड यांनी केले आहे.



