जिला

महाशिवरात्री अखंड दत्तनाम सप्ताह सोहळा

 

अर्धापूर :- उध्दव सरोदे / श्री गुरु विठ्ठलनाथ महाराज देवस्थान येथे महाशिवरात्री निमित्ताने अखंड दतनाम सप्ताह सोहळा 21ते 27 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आला असून 27 फेब्रुवारी रोजी गुरू विठलनाथ समाधीचा महाअभिषेक समाधान महाराज यांच्या हस्ते होणार असून दुपारी 2 वाजता खा.अशोकराव चव्हाण व मान्यवरांच्या उपस्थितीत महाप्रसाद आयोजन करण्यात आले आहे.

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी महाशिवरात्री निमित्ताने वर्ष 55 व्या वर्षी तिर्थक्षेत्र गोपाळचावडी ता. जि. नांदेड येथे श्री गुरु विठ्ठलनाथ महाराज मंदिर देवस्थान गोपाळावडी ता.जि. नांदेड येथे अखंड दत्तनाम सप्ताह पालखी व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. आपण या सोहळ्यास उपस्थित राहून गुरु अमृताचा लाभ घ्यावा ही विनंती. कार्यक्रमाची रुपरेषा दि.21फेब्रुवारी रोजी 27 सोमवार पहाटे 5 वाजता श्री समगिरीजी गुरू जयगिरीजी महाराज, यांच्या हस्ते महापुजा , दत्तनाम सप्ताहास प्रारंभ व सात दिवस अखंड दत्तनाम सप्ताह सुरुवात होईल.

दि. 27 फेब्रुवारी रविवार आमावस्येच्या दिवशी दुपारी 1 वाजता त्रिभुज बबुत्रा व श्री गुरु विठ्ठलनाथ महाराज यांच्या समाधीचा महाअभिषेक, श्री समाधान महाराज यांच्या हस्ते होईल व दुपारी 2 वाजता उपस्थित राहणार आहेत.खासदार‌अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली होणार असुन प्रमुख पाहुणे नांदेड दक्षिण आमदार आनंदराव पाटील बोढारकर, गंगाप्रसाद धोंडीबा काकडे सदस्य, माजी जिल्हा परिषद सदस्य नादेड ,मनोहर पाटील शिंदे सदस्य, परिषद नांदेड विनय पाटील गिरडे माजी उपमहापौर ना.वा.म.न.पा, साहेबराव बालाजी पा. सेलुकर उपसरपंच गोपाळचावडी , सरपंच सौ.सुरेखा प्रदीप लाखे,दलीत मित्र माधव अंबटवार, श्रीमती गिरजा बाई तुळशिराम डाकोरे माजी सरपंच गोपाळ चावडी,

दुपारी 3वाजता महाप्रसाद रात्री ठीक 7 वाजता गुरु विठ्ठलनाथ महाराज यांच्या पादुका पालखी सोहळा गावातील प्रमुख रस्त्याने निघेल व रात्री 8 वाजता द. आनंद दत कृपा भजनी मंडळ आलेगाव ,हभप बबलू पाटील वर्तळे व गुरुकृपा भजनी मंडळ सरेगाव ता.मुखेड हभप एकनाथ पाटील गिरे 28 फेब्रुवारी रोजी पहाटे पाच वाजता काकडा आरती व अखंड हरिनाम सप्ताह सांगता होणार आहे.सर्व भाविक भक्तांनी कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक व मुख्य पुजारी समाधान तुळशीराम महाराज डाकोरे व गावकरी मंडळी गोपाळचावडी यांनी केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *