जिला

शिवसेना अल्पसंख्यांक विभागाच्या भोकर विधानसभाध्यक्षपदी मोहम्मद बुऱ्हाण यांची नियुक्ती

 

मुदखेड : शिवसेना संघटना अधिक बळकट करण्यासह अल्पसंख्यांक समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने शिवसेना अल्पसंख्यांक विभागाच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. या नियुक्ती सोहळ्यात मोहम्मद बुऱ्हाण अब्दुल मजीद यांची भोकर विधानसभाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

शिवसेनेचे नेते तथा विधान परिषदेचे गटनेते आमदार हेमंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्ती सोहळा पार पडला. शिवसेना अल्पसंख्यांक विभागाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार सईद खान यांच्या सूचनेनुसार तसेच शिवसेना भोकर विधानसभा नेते व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक इंजि. विश्वंभर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्हाप्रमुख अनवर अहमद यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले.

यावेळी मोहम्मद बुऱ्हाण अब्दुल मजीद यांची भोकर विधानसभा अध्यक्ष शेख मुकीद शेख जानीमिया यांची मुदखेड तालुका अध्यक्षपदी, तर सय्यद जब्बार सय्यद जाफर यांची भोकर तालुकाध्यक्ष, शेख समीर शेख जैनुद्दीन यांची मुदखेड शहराध्यक्ष आणि शेख इब्राहिम यांची भोकर शहराध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.

कार्यक्रमाला शिवसेना भोकर तालुकाप्रमुख माधव पाटील वडगावकर, युवक तालुकाप्रमुख दर्शन पाटील डुरे, मुदखेड उपतालुकाप्रमुख बाळू पाटील मुगल, सचिन पाटील किन्हाळकर, राहुल चौदंते, शेख हकीम मुजीब भाई यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून संघटना अधिक सक्षम करण्यासाठी आणि अल्पसंख्यांक समाजातील प्रत्येक घटकापर्यंत शिवसेनेची विचारधारा व विकासाची भूमिका पोहोचविण्याचे आवाहन केले. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्य करण्याची ग्वाही दिली

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *