जिला

रमजान महिन्यात दुकाने रात्री उशिरा पर्यंत चालू ठेवण्यास परवानगी

 

नांदेड दि. 4 आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी रमजान महिन्याच्या कालावधीमध्ये मुस्लिम बांधवांच्या सोयीसाठी रात्री उशिरापर्यंत दुकाने आणि आस्थापना चालू ठेवण्याची मागणी केली होती त्यावर कामगार आयुक्त आणि 2017 च्या महाराष्ट्र दुकाने अधिनियमांचा दाखला देऊन सण उत्सवाच्या कालावधीमध्ये रात्री उशिरापर्यंत दुकाने आणि आस्थापना चालू ठेवण्यास परवानगी आहे असे सूचित केले आहे हे करत असताना कामगारांकडून आठ तासांपेक्षा जास्त काम करून घेतले जाऊ नये आणि त्यांना साप्ताहिक एक सुट्टी दिली जावी याचे पालन करणे आवश्यक आहे.

यासोबतच दिवाळी नाताळ या उत्सवाच्या कालावधीमध्ये देखील रात्री उशिरापर्यंत दुकाने आणि आस्थापना चालू ठेवण्यास कोणतीही हरकत नाही असे नमूद केले आहे. यामुळे मुस्लिम बांधवांना आता रमजान महिन्यांमध्ये अधिक चांगल्या प्रकारे इबादत करणे आणि खरेदी करणे सोयीचे होणार आहे. आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केलेल्या मागणीमुळे मुस्लिम बांधवांनी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे आभार व्यक्त केले आहेत.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *