रमजान महिन्यात नागरी सुविधा पुरवा मुस्लिम शिष्टमंडळाचा पालिकेला निवेदन
पाणीपुरवठा एकाच ठराविक वेळेत करावा,मदिना मस्जिद समोरील खड्ड्यांवर मॅन होल टाकण्यात यावे

मुदखेड तालुका प्रतिनिधी मोहम्मद हकीम / मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना दि. 02 मार्चपासून संपूर्ण देशात सुरू झाला असून या अनुषंगाने मुदखेड शहरातील मुस्लिम बांधवांनी दि. 28 फेब्रुवारी रोजी नगरपालिकेला एक निवेदन सादर करत रमजानच्या पवित्र महिन्यात नागरिक सुविधा नियमित पुरवण्यासाठी मागणी करत शहरात पाणीपुरवठा नियोजनाचा नियोजन करताना एकाच ठराविक वेळेत पाणी पुरवठा करण्यासाठी जोर देत विशेष करून रेल्वे स्टेशन परिसरात पाणीपुरवठा अनियमित आणि ठराविक वेळेत होत नसल्याचा सुद्धा पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले यावेळी नगरपालिका कार्यालयीन अधीक्षक अधीक्षक गुंठे मॅडम यांच्यासह मोहम्मद अजीम मुल्ला,दिलीप पवार ,मोहन कावळे मुस्लिम शिष्ट मंडळाकडून निवेदन स्वीकारले.
मुस्लिम शिष्टमंडळाकडून दिलेल्या निवेदनात शहरातील प्रत्येक मस्जीदसमोर दररोज स्वच्छता ठेवण्याकरिता संबंधित गुत्तेदाराला आदेशित करण्यात यावे, ज्या भागात विद्युत खांबांवर लाईट बंद आहे अशा बंद पडलेल्या विद्युत कामांवर पथदिवे लावण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्याला आदेशित करण्यात यावे, रेल्वे स्टेशन परिसरातील मदिना मस्जीदसमोर नवीन पाण्याची पाईपलाईन टाकताना करण्यात आलेल्या खड्ड्यांवर मॅन होल बसून घाण कचरा साचणार नाही व दुर्गंधी पसरणार नाही याची दक्षता घ्यावी रेल्वे स्टेशन परिसरातील मिल्लत नगर, मदिना नगर ,बिलाल नगर आणि दुर्गा नगर परिसरात पाणीपुरवठा
नियमित न होता अनियमित होत असून रमजानचे दिवस असल्यामुळे धार्मिक विधी सोडून पाणी भरण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते ज्यामुळे प्रचंड उपासाच्या काळात त्रास होत असल्यची या वेळी सांगण्यात आले याप्रसंगी मदिना मस्जिद कमिटीचे अध्यक्ष महम्मद युसुफ अब्दुल रहमान, मौलाना अशफाक मैनोद्दीन, पत्रकार शेख इमाम शेख फरीद, अतीख अहेमद, शेख मोईन भाई फुलारी, शेख मेहमूद भाई, नय्युम पठाण आदींची या वेळी उपस्थिती होती.



