वसीम बाबू सेठ यांच्या कार्यालयात इफ्तार पार्टीचे आयोजन

नांदेड दि.२३येथील रेल्वे स्टेशन रोडवरील मस्जिद-ए-युनुसच्या मुतवल्ली, कुटुंब आणि मित्रमंडळींच्या वतीने वसीम बाबू सेठ यांच्या कार्यालयात रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते,ज्यामध्ये अनेक धर्मातील धार्मिक नेते आणि नागरिक सहभागी झाले होते.

सध्या मुस्लिम समाजातील पवित्र रमजान महिना चालू असल्याने अनेक ठिकाणी मुस्लिम बांधवांच्या वतीने रोजा सोडतानाच्या इफ्तार पार्टीचे आयोजन केले जाते. यावेळी वसीम बाबू सेठ यांच्या कार्यालयात इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते या इफ्तार पार्टीचे वेगळेपण म्हणजे यामध्ये इतर धर्मातील धर्मगुरू आणि नेते व नागरिक यांना सुद्धा आमंत्रित करण्यात आले होते.
ज्यामुळे सामाजिक बांधिलकी वाढून समाजामध्ये सौहार्दाचे वातावरण निर्माण होण्यास मदत होईल. यामध्ये मौलाना साद अब्दुल्ला साहिब नदवी, भदंत पय्याबोधी, फादर रेव्ह.राज जॉन्सन सरदार रणजित सिंग चिरगिया सर,कामाजी पवार साहेब (मराठा सेवा संघ), प्रशासनाकडून गिरीश कदम साहेब (सहायक महापालिका आयुक्त), पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक सर (डीवायएसपी), परमेश्वर कदम सर (पोलीस निरीक्षक वजीराबाद),रणजित भोईटे सर (पोलीस निरीक्षक इतवारा), साहेबराव गुट्टे सर (वाहतूक पोलीस निरीक्षक). आणि इतर अनेक प्रतिष्ठित नागरिक या इफ्तार पार्टीमध्ये सहभागी झाले होते. स्टार पार्टीच्या शेवटी शेवटी वसीम बाबू सेठ यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे आभार मानले.



