रमजान ईद शांततेत साजरी करत पोलीस प्रशासनास सहकार्य करावे – पोलीस निरिक्षक वसंत सप्रे

मुदखेड तालुका प्रतिनिधी मोहम्मद हकीम
मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना शेवटच्या आठवड्यात असून रमजान ची ईद ईद-उल -फित्र संभवता 31 मार्च किंवा 01 एप्रिल साजरी होण्याची शक्यता आहे या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने दि. 23 मार्च सकाळी 12.00 वाजता शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत शहरातील सर्व मुस्लिम समाजातील नागरिक सह राजकारणी आणि ज्येष्ठ नागरिक उपस्थित होती पोलीस ठाण्याच्या परिसरात पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी वसंत सप्रे यांनी उपस्थित नागरिकांना संबोधन करताना सांगितले की मागच्या काळात पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करत सहकार्य अपेक्षाप्रमाणे केले असून आगामी काळातील होऊ घातलेल्या ईदचा सन सुद्धा शांततेत साजरी करत पोलीस प्रशासनात सहकार्य करण्याचे आव्हान पोलीस निरीक्षक यावेळी केले.
याप्रसंगी माजी उपाध्यक्ष करीम खाँ साब,काझी मोहल्ला मशीद कमिटी चे अध्यक्ष बाबू खान पठाण,मदीना मस्जिद कमिटी चे उपाध्यक्ष शौकत खान पठाण, नयूम सेठ बागवान, जामा मस्जिद कमिटी चे अध्यक्ष मोहम्मद रफिक भाई,माजी नगर सेवक प्रतिनिधी अब्दुल सलाम, तालुका काँग्रेस कार्याध्यक्ष मोहम्मद गौस अब्दूल नबी ,मौलाना अशफाक मोमीन,काँग्रेस शहर सचिव अतीख अहेमद, युवक काँग्रेस शहर अध्यक्ष मुजीब पठाण,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष मोहम्मद बुरहान,
ए आई एम आय एम चे शहर अध्यक्ष मोहम्मद हुसैन, वसीम अब्बासी,जमील खान पठाण,अकबर किराणा,सईद भाई फुलारी,मोहम्मद गौस, रशीद खीचडिवाले, मोहम्मद अझहर, पत्रकार मोहम्मद हकीम खानदान, पत्रकार हफीझ कुरेशी आदींनी आप आपल्या विनंती करत ईद साजरी करताना इतर संबंधित विभागांशी समन्वय करत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सूचना मांडल्या. शांतता बैतकीचे आयोजन पोलीस विभागातील जिल्हा विशेष शाखेचे प्रमुख हेड कॉन्स्टेबल किशोर पाटील यांनी केले .



