ए.आय.बी.ई परिक्षा उत्तीर्ण विधिज्ञांचे अभिनंदन करून केला सत्कार
प्रत्येक विधिज्ञांनी सामाजिक बांधिलकी जपत मेहनत, जिद्द व अभ्यासपूर्ण वकिली व्यवसाय करावा - अॅड.सचिन देशमुख

अर्धापूर:- उध्दव सरोदे – नुकत्याच झालेल्या आॅल इंडिया बार कौन्सिल (ए.आय.बी.ई) परिक्षेचा निकाल लागला असून त्या परिक्षेमध्ये अर्धापूर न्यायालयात वकिली व्यवसाय करणारे अधिवक्ता संघ अर्धापूरचे सदस्य अॅड.मंगेश सरोदे, अॅड.ओंकार देवडे,अॅड.रोहित देशमुख असे तिघे उत्तीर्ण झाल्याबद्दल अधिवक्ता संघ अर्धापूरचे सहसचिव अॅड.सचिन देशमुख यांच्या वतीने वरील उत्तीर्ण तिन्ही विधिज्ञांचे अभिनंदन व सत्कार करून पुढील वकिली व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी अॅड.सचिन देशमुख हे मनोगत व्यक्त करताना पुढे म्हणाले की,प्रत्येक विधिज्ञांनी सामाजिक बांधिलकी जपत मेहनत, जिद्द व अभ्यासपूर्ण वकिली व्यवसायाशी प्रामाणिक राहून नियमित न्यायालयात हजर राहून कर्तव्य बजावत रहावे व तसेच उर्वरित जे विधिज्ञ आॅल इंडिया बार कौन्सिल (ए.आय.बी.ई) ची परिक्षा उत्तीर्ण झाले नसतील त्यांनी कायदेशीर नियमाने ती परिक्षा उत्तीर्ण होवूनच वकिली व्यवसाय करावा अन्यथा करू नये असे मोलाचे मनोगतपर मार्गदर्शन त्यांनी केले.
यावेळी अधिवक्ता संघ अर्धापूरचे अध्यक्ष अॅड.किशोरजी देशमुख, उपाध्यक्ष अॅड.बालाजी कोंढेकर सचिव अॅड.डि.एम.लोणे,कोषाध्यक्ष अॅड.गजानन पत्रे,ज्येष्ठ विधिज्ञ अॅड.डि.बी.दासे,अॅड. ए.आर. चाऊस,अॅड.राम जोगदंड,अॅड.ए. जी.राजेगोरे,अॅड.गौरव सरोदे व पदाधिकारी आणि सदस्यांनी परिक्षा उत्तीर्ण तिन्हीं विधिज्ञांचे अभिनंदन करून पुढील वकिली व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या.



