मुदखेड येथे रमजान ईद उत्साहात साजरी

मुदखेड/ तालुका प्रतिनिधी :- प्रेम आणि राष्ट्रीय एकात्मता व बंधुभावाचे प्रतीक असलेली पवित्र रमजान ईद शहर व तालुक्यात दि.३१ मार्च रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. देशामध्ये शांतता, सुख, समृद्धी आणि सौहार्दपूर्ण वातावरण राहावे यासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. येथील ईदगाह मैदानावर मुस्लिम समाज बांधवांनी सामूहिक नमाज अदा केली. हाफीसाब मो.मेहराज अल हसन यांनी नमाजाचे पठण केले.
यावेळी माजी नगराध्यक्ष राजबहादूर कोत्तावार, राम चौधरी, माजी न.प.उपाध्यक्ष माधव पा.कदम, करीम खाँ साब काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष प्रतापराव देशमुख बारडकर ,माजी नगरसेवक कैलास गोडसे, लक्ष्मणराव देवदे, बळवंत पाटील पुयड, प्रवीण गायकवाड, संजय उर्फ पप्पू सोनटक्के, खुर्शीद सेठ, माजी नगरसेवक इम्रानसेठ मच्छीवाले, रावसाहेब चौदंते, बबलूसेठ किरणावाले, चांदू बोकेफोड, किशोर पारवेकर, डॉ.संदीप पचलिंग, मुलतानी सेठ, म.गौस सेठ, सूर्यकांत चौदंते, अविनाश चौदंते, कपिल लोखंडे, विनोद चव्हाण, पत्रकार संघाचे माजी जिल्हा सहसचिव संजय कोलते,
पत्रकार अतीक अहेमद शेख जब्बार, शेख इमामसाब, शेख शमशोद्दीन, अ.रज्जाक, शेख इरफान, धम्मा दाता कांबळे, हाफिस कुरेशी, गफ्फार भाई पारेवाले, एकबाल कुरेशी, खदिर कुरेशी, साजिद कुरेशी, शेख बबलू ज्यानीमिया, चांद कवाल, प्रभाकर पांचाळ, शिवानंद देवके, मो.सुलेमान, असलम भाई मसालेवाले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष मोहम्मद बुरहान, मो.हुसेन, वाजीद भाई, माजीद भाई, वसीम भाई, मूर्तुजा भाई ,सुनील माळी, शिवा पाटील तोटेवाड, आदींची उपस्थिती होती.
ईदनिमित्त सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी मुस्लिम समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या तर तहसीलदार आनंद देऊळगावकर, पोलीस निरीक्षक वसंत सप्रे, प्रभारी मुख्याधिकारी शैलेश फडसे यांनीही आपल्या विभागाच्या वतीने मुस्लिम समाज बांधवांना ईदनिमित्त प्रत्यक्ष किंवा भ्रमणध्वनी संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, यांच्यासह अन्य वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वसंत सप्रे, स.पो.नि.बी.आर.कांबळे, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी शिंदे, बालाजी गीते ,गवई, पो.हे .का. चंद्रशेखर मुंडे, अरविंद शिनगार पुतळे, यांच्यासह पोलिस ठाण्यातील अन्य पोलीस कर्मचारी होमगार्ड यांनी यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.



