जिला

गेली हप्त्याभरा पासून अर्धापूर शहरात पिण्याचे पाणी हिरवे व पिवळसर येवून नागरिकांचे आरोग्य धोक्यात

नागरिकांचे जीवन व आरोग्याची काळजी न करता नगर पंचायत व पाणी पुरवठा विभाग कोमात

 

अर्धापूर प्रतिनिधी:- अर्धापूर शहरात गेली हप्त्याभरा पासून पिण्याचे पाणी हिरवे व पिवळसर येवून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून याबाबत पाणी सोडणारे मोरे यांना दररोज सांगितले असता ते दररोज उत्तर देतात कि,हो मी पण माझ्या घरचे पाणी चेक केले आहे ते पाणी सुध्दा तसेच आहे म्हणून मी याबाबत पाणी पुरवठा विभागा मधील राजकिरण साखरे, संदिप गोपनपल्ले व ईतर तेथील सर्व जवाबदारांना सांगितले की पिण्याचे पाणी हिरवे व पिवळसर येत आहे त्यामुळे पाण्यात ब्लिचिंग पावडर टाका असे म्हणालो व ते पण टाकतो असे म्हणाले परंतु यांच्या घोळा मध्ये आजपर्यंत जवाबदार नगर पंचायत प्रशासन व पाणी पुरवठा विभाग यांनी नागरिकांच्या आरोग्याची कोणतीच काळजी व पर्वा न करता काहीच केले नसून पिण्याचे पाणी आजही जसेच्या तसेच येत आहे.

परत दररोज पाणी सोडणार यांना विचारले की पाणी अजून तसेच येत आहे आणि अशा पिण्याच्या पाण्याने आम्हाला कोणता आजार झाला तर त्याचा जवाबदार कोण असे म्हणाल्यावर ते बेजबाबदारपणे असे म्हणतात की,असे पाणी आल्यावर आपल्या आरोग्याला कोणताच धोका नाही, असे बोलण्याऐवजी त्यांनी नियमाने पाण्याच्या बाबतीत कोणतीही तक्रार सांगण्याच्या अगोदर संबंधितांनी दररोज पाणी तपासणी करण्याकरिता आले पाहिजे असा शासनाचा नियम असून ते पूर्ण नियम नगर पंचायत प्रशासन व पाणी पुरवठा विभागाने पुर्णपणे धाब्यावर बसवलेले आहेत हे त्यांच्या बेजवाबदारपणा मुळे दिसून आले आहे.

यापूर्वी मा.मुख्याधिकारी यांना पिण्याचे पाणी असेच येत असल्याने फोन व व्हाट्सअप अॅपवर मॅसेज व बातमी कळवल्याने ताबडतोब पाणी तपासणीसाठी वरील पाणीपुरवठा विभागातील सर्व जवाबदार व पाणी सोडणारे मोरे हे येवून ती समस्या दुसऱ्या दिवशी सोडवत असे परंतु गेली हप्त्याभरा पासून पिण्याचे पाणी हिरवे व पिवळसर येत असून याची माहिती व कल्पना दररोज पाणी सोडणार यांना बोलून व दाखवून सुध्दा त्याबद्दल त्यांचे याबद्दल असेच म्हणने आले कि “हमको महिने को पगार मिलता और हमारा काम बनता, फिर भाड मे जाए जनता” व राजकीय नेते,पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे पण पुढील प्रमाणे

म्हणजेच “काम सरो वैद्य मरो” असे म्हणून वेळ व काम साधून घेतात तसेच नगर पंचायत प्रशासन व पाणी पुरवठा विभाग यांनी घेतले परंतु जनता पण हूशार असून तूमच्या खोट्या भुलथापांना बळी न पडता त्यांनी मा.जिल्हाधिकारी नांदेड,मार्फत मा.स्वच्छता व आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य,मा.केन्द्रिंय आरोग्य मंत्री यांना तक्रार अर्जाद्वारे निवेदन दिले असून याबाबत कोणता आदेश येणार याकडे सर्व आरोग्य धोक्यात असलेल्या नागरिकांचे लक्ष लागलेले आहे

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *