क्राईम

सार्वजनिक रोडवर अश्लील शिवीगाळ,थापड बुक्क्यांनी मारहाण व जीवे मारून टाकण्याच्या धमकीतील आरोपींची निर्दोष मुक्तता

अर्धापूर न्यायालयाच्या प्रमुख न्यायप्रिय न्यायाधिश मा. श्रीमती.आर.बी.सोरेकर यांचा न्यायनिर्णय

 

 

अर्धापूर:- उध्दव सरोदे – दि.०१/०७/२०१८ रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास मौजे एकदरा ता.जि.नांदेड येथील फिर्यादी शिवनंदा संतोष आरसुळे हिने माझ्या घरासमोरील सार्वजनिक रोडवर माझ्या घराच्या भिंतीला लागून तूम्ही मोकळ्या जागेत कचरा का टाकला म्हणून विचारल्याने आरोपींनी संगनमत करून फिर्यादी व तिच्या पतीस अश्लील शिविगाळ,थापड बुक्क्यांनी मारहाण व जीवे मारून टाकण्याची धमकी दिली अशा तक्रारी वरून रायभान गोविंदराव आरसुळे व लक्ष्मीबाई गोविंदराव आरसुळे या दोघांविरुद्ध पोलिस ठाणे अर्धापूर येथे गुन्हा क्र. १३८/२०१८, कलम – २९४,३२३,५०४,५०६ व ३४ भा.द.वी.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यानंतर तपासिक पोलिस अंमलदार यांनी घटनास्थळ पंचनामा, साक्षीदारांचे जवाब,आरोपी अटक आदि तपास करून सदर गुन्ह्याचे दोषारोपपत्र मा.अर्धापूर न्यायालयात दाखल केल्यानंतर प्रकरण न्यायालयात चालू असतांना सरकार पक्षातर्फे सदर प्रकरणात एकूण ७ साक्षीदार तपासण्यात आल्यानंतर सरकारी विधिज्ञ व दोन्हीं आरोपींचे विधिज्ञ यांचा अखेरचा युक्तिवाद ऐकून अर्धापूर न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधिश श्रीमती.आर.बी.सोरेकर यांनी दि.२८/०३/२०२५ रोजी सदर प्रकरणात न्यायनिर्णय दिला की दोन्हीं आरोपींची सदर प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात येते.यावरून असे सिद्ध झाले कि,

फिर्यादीने दिलेली आरोपीं विरूद्धची तक्रार ही खोटी होती व आरोपींनी अश्लील शिविगाळ, थापड बुक्क्यांनी मारहाण व जीवे मारून टाकण्याची धमकी दिली अशी कोणतीच घटना केलेली नव्हती.या प्रकरणातील दोन्हीं आरोपींचे विधिज्ञ अॅड.गौरव उध्दवराव सरोदे यांनी आरोपींची भक्कम बाजू मांडून आरोपींची निर्दोष मुक्तता करून प्रकरण जिंकल्याबद्दल अॅड.गौरव उध्दवराव सरोदे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *