क्राईम

पतीची गळाफास तर पत्नी मृत अवस्थेत दिसुन आले…

मुदखेड तालुक्यातील रोहपिंपळगाव येथे थरार घटना...

 

 

मुदखेड ता. मुदखेड तालुक्यातील रोहीपिंपळगाव येथील शेतकरी बाबासाब बाजीराव शिंदे वय ४० तर पत्नी रुक्मिणी बाबासाब शिंदे वय ३५ हे दोन दाम्पत्याची एकाची गळाफास तर दुसरी मृत्यू अवस्थेत दिसून आल्याची घटना दिनांक 4 एप्रिल रोजी दुपारी एक वाजत दरम्यान स्वतःच्या शेतात घडली आहे.

रोहीपिंपळगाव येथील शेतकरी बाबासाब बाजीराव शिंदे व त्यांच्या पत्नी रूक्‍मीनबाई बाबासाब शिंदे हे दोघेही रोहीपिंपळगाव आपल्या घरून सकाळी नेहमीप्रमाणे शेतामध्ये गेले होते परंतु दुपारी एकच्या दरम्यान बाबासाब शिंदे हा लिंबाच्या झाडाला गळफास घेतल्याचं दिसून आलं तर पत्नी त्याच ठिकाणी मृत्यू अवस्थेत जमिनीवर दिसून आली या घटनेची माहिती आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी दिल्याने गावातील नागरिकांनी बाबासाब शिंदे यांच्या शेताकडे धाव घेतली…

या घटनेची माहिती रोहीपिंपळगाव येथील पोलीस पाटील यांनी मुदखेड पोलीस ठाण्यात सांगितले
या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपविभागीय अधिकारी बेन, मुदखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सप्रे , पोलीस उपनिरीक्षक शिंदे, बिट जमादार दिलीप चक्रधर, रमेश पुणेगोविदवाड, बाळवत कदम, प्रकाश सुनकमवार यांच्या सह अदी पोलिस घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला.

घटना शेतातील लिंबाचा झाडा ला गळफास घेऊन आत्महत्या केली तर पत्नी बेशुद्ध अवस्थेत पडून होते
असं पोलीसांकडून सांगण्यात आले परंतु मुदखेड ग्रामीण रुग्णालयात दोघेही पती-पत्नींना दाखल करण्यात आल्या त्यावेळी डॉक्टरांनी पत्नी हे मृत्यू झाल्याचं सांगितले.

घटना दुपारी एक वाजता दरम्यान घडली पतीची झाडाला गळाफास घेतलेली आढळून आले तर पत्नी त्याच ठिकाणी मृत्यू अवस्थेत पडलेले होती सदर घटना आत्महत्या आहे की हे मात्र पोस्टमार्टम रिपोर्ट नंतर सांगण्यात येईल.

सदर घटनेचा मुदखेड पोलीस स्टेशन मध्ये इडी दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती. शेतकरी बाबासाब बाजीराव शिंदे व त्यांच्या पत्नी रूक्‍मीनबाई बाबासाब शिंदे या दोघांचं पोस्टमार्टम साठी मुदखेड ग्रामीण रुग्णालयात करण्याची प्रक्रिया रात्री उशिरा चालू होती.

त्यांच्यावर रोहीपिंपळगाव येथे रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे ग्रामीण रुग्णालयात उपस्थित नातेवाईक व समाज बांधवांनी सांगितले आहे…

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *