मनवात रेल्वे स्थानकावर संशयित ToPB गुन्हेगार ताब्यात

दिनांक 30.09.2026 रोजी सुमारे 09:30 वाजता, SIPF/सेलू व ToPB प्रतिबंधक पथकाने मानवत रेल्वे स्थानकावर विशेष निगराणी केली. या कारवाईदरम्यान जावेद, वय 38 वर्षे, रा. अमरावती यास प्रवाशांच्या मालमत्तेची चोरी करण्याचा प्रयत्न करताना ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ₹12,990/- किंमतीचा Vivo Y20 मोबाईल फोन देखील जप्त करण्यात आला. सदर संशयित व जप्त मोबाईल फोन पुढील कायदेशीर कारवाईसाठी GRP/परभणी यांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी NCR क्र. 206/2026, महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम 110 व 117 अन्वये, दिनांक 01.10.2026 रोजी नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
परभणी रेल्वे स्थानकावर संशयित ToPB गुन्हेगार ताब्यात
दिनांक 01.10.2026 रोजी सुमारे 09:00 वाजता, IPF/परभणी व SIPF/सेलू यांच्या देखरेखीखाली RPF कर्मचाऱ्यांनी तसेच ToPB प्रतिबंधक पथकाने परभणी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्र. 01 वर विशेष निगराणी केली. या कारवाईदरम्यान माबूद, वय 35 वर्षे, रा. परभणी यास गाडी क्र. 17629 हडपसर–नांदेड एक्सप्रेसमध्ये प्रवाशांची चढ-उताराची वेळ साधून त्यांच्या मालमत्तेची चोरी करण्याचा प्रयत्न करताना ताब्यात घेण्यात आले. सदर संशयितास पुढील कायदेशीर कारवाईसाठी GRP/परभणी यांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी NCR क्र. 58/2026, BNS च्या कलम 128 अन्वये, दिनांक 01.10.2026 रोजी नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
RPF ToPB प्रतिबंधक पथकाकडून संशयित ToPB गुन्हेगार ताब्यात
दिनांक 01.10.2026 रोजी HC सुनील नलावडे, HC-322/CPDS/Team/NED, ToPB प्रतिबंधक पथकाचा भाग म्हणून, विशेष निगराणी दरम्यान एका संशयित ToPB गुन्हेगारास ताब्यात घेतले. सदर संशयितास पुढील कायदेशीर कारवाईसाठी GRP/परभणी यांच्या ताब्यात देण्यात आले. वरील सर्व कारवायांमधून प्रवाशांच्या मालमत्तेची चोरी रोखण्यासाठी, सराईत गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच रेल्वे प्रवाशांना सुरक्षित व संरक्षित प्रवासाचे वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी RPF/नांदेड विभागाकडून सातत्याने व सक्रियपणे प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत असल्याचे स्पष्ट होते.
श्री दीपचंद्र आर्य, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त/RPF/नांदेड यांनी विशेष CPDS पथक/RPF/नांदेड , CIB/D&I/नांदेड व GRP यांच्या समन्वयाने केलेल्या उल्लेखनीय व समर्पित कार्याचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी RPF/नांदेड विभागाकडून गुप्त माहितीच्या आधारे निगराणी, प्रतिबंधात्मक तपासणी आणि समन्वयित कारवाई यापुढेही अधिक प्रभावीपणे राबविण्यात येईल.
तसेच, RPF/नांदेड विभाग प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पूर्णपणे कटिबद्ध असून, प्रवाशांनीही सतर्क राहावे, आपली मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवावी आणि कोणतीही संशयास्पद हालचाल अथवा चोरीची घटना आढळल्यास तात्काळ Rail Madad हेल्पलाइन 139 वर किंवा जवळच्या RPF/GRP चौकीशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



