अॅटोरिक्षा चालक व मालक यांनी पांढऱ्या रंगाचा गणवेश परिधान करणे बाबत…

नांदेड दि. 9 / महाराष्ट्र राज्यातील वाहतुकीचे नियमन व व्यवस्थापन सुरळीत करण्यासाठी अॅटो रिक्षा चालक व मालक यांनी पांढऱ्या रंगाचा गणवेश परिधान करणे बाबत महाराष्ट्र शासनाचे निर्देश प्राप्त झाले आहेत.
यापुर्वी देखील अॅटोरिक्षा चालक व मालक यांनी खाकी व पांढऱ्या रंगाचा गणवेश परिधान करणे बाबत निर्देश देण्यात आले होते परंतु अॅटोरिक्षा चालक व मालक हे सदर निर्देशाचे पालन करताना दिसून येत नसल्याने महाराष्ट्र शासनाने निर्देश देवून अॅटोरिक्षा चालक व मालक यांनी पांढऱ्या रंगाचा गणवेश परिधान करावा बाबत सुचित केले आहे.
तरी महाराष्ट्र शासनाच्या निर्देशा प्रमाणे नांदेड शहरातील अॅटोरिक्षा चालक व मालक यांनी नियमीतपणे पांढऱ्या रंगाचा गणवेश परिधान करूनच अॅटोरिक्षा चालवावे. महाराष्ट्र शासनाने निर्देशीत केल्या प्रमाणे पांढऱ्या रंगाचा गणवेश परिधान करणार नाहीत त्यांचे विरूध्द कायदेशीर कार्यवाही करून दंड आकारण्यात येईल असे आवाहन नांदेड पोलीस प्रशासनाचे वतिने करण्यात येत आहे.



