जिला

महात्मा फुले जयंतीनिमित्त नांदेड जिल्हा परिषदेच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रमाचे आयोजन

महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतण्यास पुष्पहार अर्पण व रक्तदान शिबिराचे आयोजन

 

नांदेड, 10- थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त नांदेड जिल्हा परिषदेत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम जिल्हा परिषद नांदेडच्या महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अधिकारी-कर्मचारी संयुक्त जयंती महोत्सव समितीच्या वतीने आयोजित केला आहे. कार्यक्रमाची सुरुवात आज 11 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता आयटीआय परिसरात महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास भव्य पुष्पहार अर्पण करून होणार आहे. या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

या वेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, यांच्यासह सर्व विभागांचे विभागप्रमुख उपस्थित राहणार आहेत. यानंतर सकाळी 11 वाजता जिल्हा परिषद प्रांगणात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, याचे उद्घाटनही सीईओ मेघना कावली यांच्या हस्ते होणार आहे.

या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे सर्व कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे तसेच रक्तदान शिबिरात सहभाग घ्यावा, असे आवाहन महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव मंडळाचे अध्यक्ष रणजीत गजभारे, सचिव धनंजय गुम्मलवार, कार्याध्यक्ष राजेश जोंधळे, कोषाध्यक्ष सचिन चौदंते, प्रसिद्धी प्रमुख जितेंद्र तोटलवार व मिलिंद व्यवहारे तसेच राघवेंद्र मदनुरकर, बालाजी नागमवाड, अशोक मोकले, पवन तलवारे, अशोक कासराळीकर, लक्ष्मीकांत मोटरवार,

शेख मुकरम, संतोष मठपती, बालाजी महाजन, विक्रम रेंगूनटवार, मंगेश ढेबरे, ज्ञानेश्वर वानखेडे, योगेश वाघ, शिवराज कोल्हे, महेश लोणीकर, उमाकांत हाळे गजानन अगरमोरे, सतीश जकाते ,राजू गोवंदे, शेख जाफर, राजरत्न ढोले, विजय कदम, आनंद सावंत, दीपक महालिंगे, बजरंग तेलंग, अल्केश शिरशेटवार, मुक्तेश्वर चिवडे, विजय थोरात, छाया कांबळे, बलजीत कौर, प्रेमला चौदते, गंगावनी आळंदीकर, इंदुमती वाघमारे, उज्वला गजभारे, कीर्ती मिवळे, शालिनी शेळके, गोविंद गज्जेवार यांनी केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *