जिला

वनसंवर्धनासह वन्यजीव संरक्षण काळाची गरज. – तहसीलदार डॉ.धम्मप्रिया गायकवाड.

घुंगराळ्यात वसुंधरा दिन साजरा ; वृक्षारोपन व वन्यजींवासाठी पाणवठ्यात पाणी पुरवठा.

नायगांव बा.- पर्यावरणांच्या समस्या दिवसेंदिवस वाढीस असल्याने त्या निवारणासाठी वनसंवर्धन व वन्यजीव संरक्षण काळाची गरज असल्याचे मत नायगांवच्या तहसीलदार डाॅ.धम्मप्रिया गायकवाड यांनी व्यक्त केले.
नांदेड वनविभागाचे उपवनसंरक्षक केशव वाबळे,तेंदू व कॅम्पाचे सहाय्यक वनसंरक्षक भिमसिंग ठाकूर यांच्या मार्गदर्शनातून वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय देगलूर (प्रा.) अंतर्गत नियतक्षेत्र मांजरम,मौजे घुंगराळा कक्ष क्रमांक-576 -a याठिकाणी आज जागतिक वसुंधरा दिनी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

या कार्यक्रमास तहसीलदार डॉ.धम्मप्रिया गायकवाड यांच्यासह देगलूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी निखील हिवरे,नांदेड जिल्हा मराठी पञकार संघाचे मा.जिल्हा उपाध्यक्ष व राष्ट्रवादी किसान सभेचे मा.प्रदेश प्रतिनिधी लक्ष्मणराव मा.भवरे, मंडळ अधिकारी आरु, वनपरिमंडळ अधिकारी बालाजी संतवाले,ग्रामपंचायत अधिकारी हनमंत शिंदे,पत्रकार किरण वाघमारे,सहदेव तुरटवाड आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वड, पिंपळ, पेरु,चिकू,मोगरा आदी विविध प्रकारची रोपे लावण्यात आली. तसेच,भवरे यांनी वन्यप्राण्यासाठींच्या पाणवठ्यात स्वखर्चातून टॅकरद्वारे आणलेले पाणी सोडण्यात आले.
यावेळी बोलतांना वनपरिक्षेत्र अधिकारी निखील हिवरे यांनी कार्यक्षेत्रातील कामांची सविस्तर माहिती देतांनाच वसुंधरा दिनाचे महत्व तसेच,वनसंवर्धन तसेच, वन्यजीव रक्षण व यासाठीच्या जनजागृतीसाठी प्रत्येकांनी स्वयंस्फूर्तपणे सामोरे येणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले.

तर,भवरे यांनी मनोगतातून येथिल वनसंवर्धन व वन्यजीव संरक्षण आपली जबाबदारी असल्याचे सांगून आपण स्वतः येथिल तिर्थक्षेत्र, तिर्थस्थळ व निसर्ग पर्यटनाच्या मान्यतेसाठी परिश्रम घेतलेले असले तरिही यासाठी या भागातील व वरिष्ठ आजी- माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांसह प्रशासनातील स्थानिक व वरिष्ठांचेही बहुमोल सहकार्य मिळाल्याने प्राप्त निधीतून स्थानिक वनविभागाने दर्जेदार कामे करावीत अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी पूढे बोलतांना तहसीलदार डॉ.धम्मप्रिया गायकवाड म्हणाल्या की, दिवसेंदिवस वाढत असलेल्या पर्यावरण समस्यांच्या निवारणासाठी प्रत्येक व्यक्तींनी वृक्षारोपन व संगोपनासह वन्यजीव संरक्षणासाठीची जबाबदारी पूर्ण करण्याचे आवाहन केले.

प्रारंभी स्थानिक वनविभागाकडून उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले तसेच,भारतीय संविधान गौरव दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भारतीय संविधान प्रास्ताविका प्रत भेट लक्ष्मणराव भवरे यांच्यावतिने देण्यात आली.
वनपरिक्षेत्र अधिकारी निखील हिवरे यांच्या पुढाकारातून आयोजित या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वनपाल बालाजी संतवाले, वनरक्षक गजानन कोतलवार, वनमजूर मधुकर मोरे,बालाजी पांडे,भीमा श्यामा गिरी,विक्रम कळकटवाड,राजू भालेराव आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *