जिला

नांदेड जिल्हा पोलीस दलातर्फे ‘मिशन उडान’ अंतर्गत भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन – युवकांसाठी सुवर्णसंधी

नांदेड (प्रतिनिधी): पोलीस प्रशासन आणि समाज यांच्यातील बंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने, नांदेड जिल्हा पोलीस दलाने सामाजिक बांधिलकी जपत ‘मिशन सहयोग’ अंतर्गत विविध विधायक उपक्रम सुरू केले आहेत. यामध्ये ऑपरेशन बीट कनेक्ट, मिशन उडान, ऑपरेशन वारसा जतन, Nanded Police League (NPL), मिशन निर्भया, मिशन समाधान, मिशन निर्धार आणि मिशन एकता हे उपक्रम प्रामुख्याने राबवले जात आहेत.

या उपक्रमांतर्गत, ‘मिशन उडान’ च्या माध्यमातून महाविद्यालयीन युवक-युवती तसेच सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगार व करिअर मार्गदर्शनाचे कार्यक्रम घेतले जात आहेत. याचाच भाग म्हणून दिनांक ३ मे २०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत, पोलीस मुख्यालय नांदेड येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

रोजगार मेळाव्याचे वैशिष्ट्ये:

भारतातील विविध क्षेत्रांतील २५ पेक्षा अधिक नामांकित खाजगी कंपन्यांचा सहभाग,  थेट मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड,  शिक्षण – दहावी उत्तीर्ण व त्याहून अधिक पात्रता असलेले युवक व युवती पात्र,  संपूर्णपणे मोफत व समाजकल्याणकारी उपक्रम

 नोंदणी प्रक्रिया:

उमेदवारांनी खालील लिंकवर क्लिक करून किंवा QR कोड स्कॅन करून पूर्वनोंदणी करणे अनिवार्य आहे:
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSe5CBCHS0IkWYxJhhz0dDMP7DQh 9Pok KCZcMpagVevM6rrg/viewform 

उमेदवारांनी सोबत आणायचे कागदपत्र:

  • शैक्षणिक प्रमाणपत्रे,  कौशल्य प्रशिक्षण प्रमाणपत्रे (असल्यास), बायोडेटा,  दोन पासपोर्ट साईज फोटो

 उपक्रमाचा उद्देश:

  • युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे,  बेरोजगारीमुळे गुन्हेगारीकडे झुकण्यापासून प्रतिबंध,  समाजात स्थैर्य व सुरक्षिततेची भावना निर्माण करणे,  खाजगी क्षेत्राची सामाजिक जबाबदारी वाढवणे

सहकार्याचे आवाहन:

नांदेड पोलीस दलातर्फे समाजातील प्रतिष्ठित नागरिक, संस्था, स्वयंसेवी संघटना व उद्योग समूहांना या उपक्रमात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहिती व अभिप्रायासाठी संपर्क:

8308274100 / 7774089100 नांदेड जिल्हा पोलीस दलाने युवकांना ही सुवर्णसंधी दवडू न देता आपल्या उज्वल भविष्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *