आमदार खासदार यांच्याकडील दिव्यांगांच्या अखर्चित निधी खर्चासाठी १५ जुन पासुन आमदार खासदार यांच्या घरावर आक्रोश मोर्चा काढणार – राहुल साळवे

नांदेड प्रतिनिधी: दिव्यांगांच्या कल्याण व पुनर्वसनासाठी शासन स्तरावरून विविध कल्याणकारी व वैयक्तीक लाभाच्या योजना राबविल्या जातात परंतु स्थानिक पातळीवर त्या योजनांची अंमलबजावणी होत नसल्यामुळे दिव्यांगांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांपासून वंचितच रहावे लागते. स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरी स्वराज्य संस्थाकडे ज्याप्रमाणे दिव्यांगांच्या हक्काचा राखीव पाच टक्के निधीची तरतूद केली गेली आहे त्याचप्रमाणे आमदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रम अंतर्गतच्या निधीमध्ये सुद्धा आमदार महोदयांना आप आपल्या मतदारसंघातील दिव्यांगांवर दरवर्षी तीस लक्ष रूपये खर्च करण्याचे नियोजन विभागाचे शासन निर्णय आहेत.
त्याचप्रमाणे खासदार महोदयांना सुद्धा भारत सरकार एम्पीलैड्समध्ये सुद्धा आपल्या लोकसभा मतदारसंघातील दिव्यांगांवर कमितकमी तीस लक्ष रूपये दरवर्षी खर्च करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे परंतु नांदेड शहर तथा संपुर्ण जिल्ह्यात आमदार खासदार यांनी हा निधी अद्याप खर्च केला नाही हा निधी दरवर्षीच खर्च करण्यात यावा यासाठी बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीच्या माध्यमातून सन २०१६ पासुन ते आजवर निवेदने देऊन आंदोलने उपोषणे करून मोर्चे काढुनही अद्याप तो निधी खर्च केला जात नसल्यामुळे तसेच जिल्ह्यातील एकही आमदार खासदार दिव्यांगांचे प्रश्न विधानसभेत लोकसभेत मांडत नसल्यामुळे बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीच्या वतीने दिनांक १५ जुन २०२५ ते दि ३१ मार्च २०२६ या दरम्यान नांदेड शहर तथा संपुर्ण जिल्ह्यातील आमदार, लोकसभेचे खासदार,
राज्यसभेचे खासदार आणि विधानपरीषदेचे आमदार यांच्या घरावर, कार्यालयावर, सभास्थळी, बैठकस्थळी आक्रोश मोर्चा काढुन तिवृ ते अति तिवृ स्वरूपाचे विद्रोही आंदोलन करण्यात येणार आहे आणि या काळात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक प्रचारासाठी येणाऱ्या पंतप्रधानांसह केंद्रीय सर्व मंत्री,मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व इतर सर्व आमदार खासदार माजी मंत्री माजी आमदार खासदार यांना काळे झेंडे दाखवत चलेजावचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्फत नुकतेच सादर केले आहे तसेच पुढील प्रत जिल्हा नियोजन समितीचे सचिव तथा जिल्हाधिकारी नांदेड.पोलीस उपमहानिरीक्षक परीक्षेत्र नांदेड.
पोलीस अधिक्षक नांदेड.जिल्हा नियोजन अधिकारी नांदेड यांना देऊन त्यांच्याच मार्फत आमदार, खासदार आणि संबंधित पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना दिले आहे या निवेदनावर बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीचे अध्यक्ष राहुल सिताराम साळवे. उपाध्यक्ष आदित्य पाटील, युवाअध्यक्ष कार्तिक कुमार भरतिपुरम.जिल्हा संघटक सय्यद आरिफ यांच्या स्वाक्षऱ्या आहेत तर आमदार खासदार यांच्या घरावर काढण्यात येणाऱ्या आक्रोश मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन रवि कोकरे.शिवाजी सुर्यवंशी.प्रदिप हणवते.संजय धुलधाणी.भोजराज शिंदे , मुंजाजी कावळे.शेख आलिम.शेषेराव वाघमारे. सय्यद आतिक.प्रशांत हणमंते.सईद मौलाना. राजु इरावतीन. शेख सादिक. मसुद मुलाजी.पिंटु राजेगोरे.नागेश निरडी.शेख माजिद,मुंजाजी कावळे, अजय गोरे,भाग्यश्री नागेश्वर, कल्पना सकते, सविता गवते यांनी आज केले आहे.



