नांदेडच्या चौफाळा परिसरात वारंवार लाईट गायब – एमएसईबीच्या दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त, शिवसेनेचा इशारा

नांदेड – शहरातील जुना नांदेड, चौफाळा, रंगार गल्ली, सराफा भाग, मारवाड गल्ली, शनी मंदिर, भोई गल्ली, सिद्धनाथपुरी, बर्र्मापुरी गल्ली, विणकर कॉलनी, सूटेकडी, तकिया, पठाण गल्ली, जुनागंज या भागात सतत लाईट जात असल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, या भागात एमएसईबी प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष झाले असून, वारंवार विज पुरवठा खंडित होतो आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यास, व्यावसायिकांचे कामकाज आणि घरगुती जीवन सुद्धा विस्कळीत झाले आहे.
या पार्श्वभूमीवर युवा सेना – शिवसेना (ठाकरे गट) तर्फे इशारा देण्यात आला आहे की, जर लवकरात लवकर या भागातील लाईट समस्येवर उपाय करण्यात आला नाही, तर एमएसईबी कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
यासंदर्भात गजानन साहेबराव हारकरे शहर प्रमुख युवा सेना नांदेड दक्षिण यांनी प्रशासनाला ठाम इशारा दिला असून, नागरिकांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी मागे हटणार नाही, असे त्यांनी सांगितले आहे.



