नांदेडमध्ये अमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई – 14.13 लाखांचा गांजा जप्त, दोघे अटकेत!

नांदेड, 1४ जून 2025: स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांनी अवैध गांजा विक्री व वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना अटक करत एक मोठी कारवाई केली आहे. यामध्ये एकूण 182 किलो 700 ग्रॅम गांजा आणि एक बोलेरो चारचाकी वाहन असा एकूण 14,13,500/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेले आरोपी: माधव विठ्ठल जाधव (वय 39), रा. धर्मापुरी तांडा, ता. कंधार, अशोक मरीबा वाघमारे (वय 30), रा. भोसी रोड, कंधार
जप्त मुद्देमाल: गांजा: वजन: 182.700 किलो, किंमत: रु. 9,13,500/- (प्रती किलो 5000/- हिशोबाने), गठ्ठे: 18, प्लॅस्टिकमध्ये पांढऱ्या-निळसर रंगाचे, उग्र वासयुक्त
वाहन: बोलेरो चारचाकी, पांढऱ्या रंगाची क्रमांक: MH 46 AP 2067 अंदाजित किंमत: रु. 5,00,000/-
पोलीस अधीक्षक मा. श्री. अभिनाश कुमार यांच्या निर्देशानुसार नांदेड जिल्ह्यात अमली पदार्थ विरोधात विशेष मोहीम सुरू आहे. त्या अंतर्गत स्थानीक गुन्हे शाखेचे पो.नि. रविकुमार वाहुळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुप्त माहितीच्या आधारे धर्मापुरी तांडा (ता. कंधार) परिसरात छापा टाकला.
छाप्यादरम्यान, बोलेरो वाहनातून गांजाचे 18 गठ्ठे सापडले, आणि दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. पो.स्टे. लोहा येथे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू आहे.
या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक मा. श्री. अभिनाश कुमार यांनी पथकाचे कौतुक केले आहे आणि अशा कारवाया भविष्यातही सुरु राहणार असल्याचे सूचित केले.



