युवा मोर्चा राम आबादार ओबीसी मोर्चा संतोष सावंत व महिला मोर्चा प्रियंका खंदारे यांची निवड…

मुदखेड प्रतिनीधी अब्दुल हकीम / मुदखेड शहर भाजपाने नुकतेच आपली शहर कार्यकारिणी जाहीर केली असून दि.१६ जुलै रोजी शासकीय विश्राम गृह मुदखेड येथे पत्रकार परिषद घेऊन कार्यकारणीची निवड जाहीर करण्यात आली..
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण,माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकरावजी चव्हाण व भोकर विधानसभेच्या आमदार ॲड.श्रीजया चव्हाण व भाजपा नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष ॲड.किशोर देशमुख यांच्या सूचनेनुसार शहर मंडल अध्यक्ष मुदखेड रामसिंग चव्हाण यांनी आपली कार्यकारणी जाहीर केली व नवीन कार्यकारिणीला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या..
या कार्यकारणी मध्ये शहर उपाध्यक्ष म्हणून गजानन कमळे,राहुल चिंतेवाड,मधुकर दवणे,उत्तम गिरी,जयश्री देशमुख,प्रियंका सूर्यवंशी,सरचिटणीस विनोद चंद्रे,प्रभाकर पांचाळ,चिटणीस राजू बारतोंडे,सुधाकर सूर्यवंशी,शैलेश बोडके दैवशाला पांचाळ संगीता गिरी,कोषाध्यक्ष कालिदास जंगिलवाड,युवा मोर्चा शहराध्यक्ष राम आबादार,महिला मोर्चा शहराध्यक्ष प्रियंका कंधारे,ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष संतोष सावंत,अनुसूचित जाती कुणाल चौदंते,अनुसूचित जमाती संदीप मोडवान,किसान मोर्चा पृथ्वीराज चौधरी,अल्पसंख्यांक मोहम्मद वसीम,सोशल मीडिया जयदीप चंद्रे, यांच्यासह कार्यकारिणी सदस्य आदींची निवड जाहीर करण्यात आली….
यावेळी भाजपाचे माधव पाटील कदम,संजय आऊलवार, भाजपाचे माजी शहराध्यक्ष संजय सोनटक्के,चांदु बोकेफोड,प्रविण काचावार,मुन्ना चांडक,प्रकाश बल्फेवाड,संजय चव्हाण,ऋशीकेश पारवेकर,जय राजवाडीकर,रतन चौदंते,पिटु बोडके,शिवा तोटेवार, दिनेश शर्मा,यांची उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार संजय कोलते यांनी केले



