लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांचे अनुदान द्यावे – काँग्रेस कमिटीचे तहसीलदारांना निवेदन

लोहा : तालुक्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर झालेले पिकांचे नुकसान भरून काढण्यासाठी शासनाने तत्काळ पुढाकार घेतला पाहिजे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांचे अनुदान द्यावे, अशी मागणी काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली.
या संदर्भात काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष मधुकर पाटील दिघे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार विठ्ठल परळीकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी माजी जि.प. सदस्य श्रीनिवास मोरे, रंगनाथ भुजबळ, माजी शहराध्यक्ष वंतस पवार, तालुका कोषाध्यक्ष शिवाजी आंबेकर, माजी नगरसेवक उत्तम महाबळे, चंद्रकांत पा. नळगे, प्रा. राजेश गोरे, सोनखेड सर्कल अध्यक्ष प्रकाश मोरे, कैलास मोरे, अंकुश वाघमारे, अनिल गायकवाड, गोविंद वड ठाकुर, किशन मोरे, मल्लिकार्जुन देशमुख, रावसाहेब मोरे, दिगंबर किवले, नारायण किरवले, नवनाथ दिघे, शंकर दिघे, माधव कदम, हानमंत क्षीरसागर, मोहनराव येवले आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून शासनाने तत्काळ दिलासा द्यावा, अशी ठाम मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. छायाचित्र : विनोद महाबळे



