शहर

इकरा उर्दू माध्यमिक शाळेत मोबाईल टॉवरचा प्रश्न ऐरणीवर

मोबाईल टॉवरमुळे विद्यार्थी आजारी? सामाजिक कार्यकर्त्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

 

नांदेड : इकरा उर्दू माध्यमिक शाळा (इमरान कॉलनी, हैदरबाग, नांदेड) या शाळेच्या इमारतीवर उभारण्यात आलेल्या मोबाईल टॉवरमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर गंभीर धोका निर्माण झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सामाजिक कार्यकर्ते एम.ए. रहेमान एम.ए. हमीद (रा. नांदेड) यांनी सामान्य प्रशासन विभागाकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, या टॉवरमुळे दररोज २ ते ३ हजार विद्यार्थ्यांवर विद्युत चुंबकीय विकिरणांचा दुष्परिणाम होत आहे. शाळेच्या वेळात विद्यार्थी सतत या विकिरणाखाली राहतात, ज्यामुळे डोकेदुखी, एकाग्रतेचा अभाव, झोप न येणे, अशक्तपणा यांसारखी लक्षणे अनेक विद्यार्थ्यांत दिसून येत आहेत.

तक्रारीत असा इशारा देण्यात आला आहे की, दीर्घकाळ या विकिरणांच्या संपर्कात राहिल्यास मेंदूचे ट्यूमर, कर्करोग, DNA बदल, अकाली म्हातारपण तसेच मुलांच्या शारीरिक वाढीवर गंभीर परिणाम होऊ शकतात.

मोबाईल टॉवर शाळेच्या इमारतीवर उभारण्यात आल्याने हे शैक्षणिक व सामाजिक दृष्टीने अयोग्य, घातक व बेकायदेशीर असल्याचा आरोप करण्यात आला आहे. केवळ आर्थिक फायद्यासाठी शाळा प्रशासनाने कंपनीला परवानगी दिल्याचे आरोपही पत्रात करण्यात आले आहेत.

मागण्या :

1. शाळेच्या इमारतीवरील मोबाईल टॉवर तात्काळ हटवण्यात यावा.
2. विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका झाल्यास जबाबदार शाळा प्रशासन व मुख्याध्यापकांवर कायदेशीर कारवाई करावी.
3. भविष्यात कोणत्याही शैक्षणिक संस्थेवर मोबाईल टॉवर उभारण्यास बंदी घालावी.
4. जिल्हा परिषद, मनपा व प्रशासनाकडून परवानगी घेण्यात आली का याची चौकशी करावी.

तक्रारीची प्रत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपा आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक व इतवारा पोलीस ठाणे यांना सुद्धा पाठवण्यात आली आहे. या प्रकरणामुळे नांदेड शहरात विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *