वडिलाचे पुण्यस्मरण विविध सामाजिक उपक्रम राबवून मदतीच्या कार्यातून करणे हे फार मोठे व महत्त्वाचे कार्य – बाळासाहेब देशमुख बारडकर
सलग ५ वर्षात रूग्णालयात फळ वाटप,रस्त्यावरील गरजू लोकांना कपडे,अन्नधान्य,छत्र्या,ब्लॅंकेट, अल्पोपहार,विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप,नेत्र तपासणी आदि

अर्धापूर :- उध्दव सरोदे – बारड ता.मुदखेड येथील प्रगतशील शेतकरी संतोषराव उर्फ बापू किशनराव देशमुख बारडकर यांचे कोरोना काळात ता २२ आॅगस्ट २०२० रोजी दुखःद निधन झाले व देशमुख परिवारावर दुखःचा डोंगर पसरला.या दुखःतून सावरत जिद्द व संघर्षाची गाठ मनाशी बांधून संतोषराव यांचे चिरंजीव तेजस देशमुख यांनी सन २०२१ पासून विविध सामाजिक उपक्रम हे मदतीच्या कार्यातून करणे हे एक फार मोठे व महत्त्वाचे कार्य आहे असे प्रतिपादन बारड ग्रा.पं.चे मा.उप सरपंच बाळासाहेब शंकरराव देशमुख यांनी केले.
ते कै.संतोषराव देशमुख यांच्या ५ व्या पुण्यस्मरण निमित्त वरद वाॅटर सप्लायर्स देशमुख गल्ली बारड येथे काॅम्प्युटर द्वारे मोफत नेत्र तपासणी शिबीर या कार्यक्रमात बोलत होते.पुढे बोलताना ते म्हणाले की,तेजस देशमुख त्यांच्या वडिलाच्या प्रथम पुण्यस्मरणापासून ” बारडच्या शासकीय रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करणे,त्यानंतर बारडच्या जिल्हा परिषद शाळेतील ५ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी लागणाऱ्या सर्व साहित्याचे वाटप करणे,त्या नंतर रस्त्यावरील गरजू लोकांना कपडे,अन्नधान्य,छत्र्या, ब्लॅंकेट वाटप करणे,त्यानंतर बारडच्या शासकीय रुग्णालयात रुग्णांना अल्पोपहाराचे वाटप व यावर्षी काॅम्प्युटर द्वारे मोफत नेत्र तपासणी शिबीर असे सलग ५ वर्ष सर्व सामाजिक उपक्रम राबवून मदतीच्या कार्यातून काम करणे हे फार मोठे व महत्त्वाचे कार्य आहे
असे कौतुक त्यांनी केले.या कार्यक्रमात जवळपास १५० लोकांची तपासणी यशस्वीरित्या करण्यात आली तर ४० लोकांनी चष्मा घेतला व १० लोकांचे मोतीबिंदू चे मोफत आॅपरेशन होणार आहेत. यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून बारड ग्रा.पं.चे मा.उपसरपंच बाळासाहेब शंकरराव देशमुख,बारड ग्रा.पं.चे.उपसरपंच प्रदीप किशनराव देशमुख,भाजपा नांदेड जि.कोषाध्यक्ष दिगंबर टिपरसे, सेवा सहकारी सोसायटी बारडचे चेअरमन अनिल शामराव देशमुख, सेवा सहकारी सोसायटी बारडचे व्हाईस चेअरमन गोविंद बने,देवराव देशमुख,आकाश देशमुख,ज्ञानेश्वर देशमुख,रामेश्वर देशमुख,आप्पाराव देशमुख,श्रीकांत देशमुख,अनिल मुपदे जि.एस.सय्यद आदिंची उपस्थिती होती.या ५ ही वर्षाच्या पुण्यस्मरणा च्या कार्यक्रमाचे आयोजनकर्ते तेजस संतोषराव (बापू ) देशमुख यांनी कार्यक्रमास उपस्थितांचे आभार मानून दरवर्षी माझ्या वडिलाच्या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमात अशाच प्रकारचे विविध सामाजिक उपक्रम राबवून मदतीचे कार्य मी नियमित करित राहीन असे ते म्हणाले.



