जिला

शास्त्रीनगर गृहनिर्माण संस्थेच्या निवडणुकीत ‘बोगस’ मतदानाचा मुद्दा चर्चेत

 

किनवट: शहरातील शास्त्रीनगर गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या आगामी चेअरमन पदाच्या निवडणुकीत ‘गैर-सदस्यांना’ मतदान करण्याची परवानगी दिली जात असल्याचा आरोप एका मूळ सभासदाने केला आहे. युसुफ खान नजरअली खान (सभासद क्र. ७) यांनी यासंदर्भात थेट सहायक निबंधक, सहकारी संस्था कार्यालय किनवट यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. त्यांनी म्हटले आहे की सध्या संस्थेवर प्रशासक लागू आहे. त्यामुळे निवडणुका घ्यावे लागेल त्यावेळी’बोगस’ सदस्यांना निवडणुकीतून वगळण्याची मागणी केली असून, या प्रकारामुळे संस्थेच्या निवडणुकीची प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

युसुफ खान यांच्या म्हणण्यानुसार, संस्थेने महाराष्ट्र सहकारी अधिनियम, १९६० च्या कलम ३५ चे उल्लंघन करून काही नवीन सदस्यांना बेकायदेशीरपणे प्रवेश दिला आहे. या कलमानुसार, कोणत्याही व्यक्तीला संस्थेचे सदस्य बनवण्यापूर्वी सहकारी संस्था कार्यालयाकडून पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. परंतु, ही परवानगी न घेताच २२ नवीन सभासद वाढवण्याचा ठराव घेण्यात आला आहे, असा त्यांचा दावा आहे.

ठरावावर बोगस सूचक म्हणून नाव
या आरोपांना पुष्टी देण्यासाठी युसुफ खान यांनी सहायक निबंधक यांना एक ठरावाची प्रत सादर केली आहे. विशेष म्हणजे, ज्या ठरावाद्वारे हे बेकायदेशीर सभासद वाढवण्यात आले, त्यामध्ये सूचक म्हणून स्वतः युसुफ खान यांचे नाव त्यांच्या संमतीशिवाय वापरण्यात आले आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून, यामुळे संस्थेतील कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
खान यांनी आपल्या तक्रारीत स्पष्ट केले आहे की, अशा अवैध सदस्यांना निवडणुकीत मतदान करण्याचा किंवा उमेदवार म्हणून उभे राहण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही. संस्थेच्या उपविधी (बाय-लॉज) नुसार फक्त नोंदणीकृत आणि भागभांडवल जमा केलेल्या मूळ सदस्यांनाच मतदानाचा हक्क आहे.

युसुफ खान यांनी सहायक निबंधकांना विनंती केली आहे की, या नियमांचे काटेकोर पालन करून केवळ पात्र आणि नोंदणीकृत सदस्यांनाच मतदानाचा अधिकार द्यावा, जेणेकरून निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक होईल. या तक्रारीमुळे आता सहकारी संस्था कार्यालय यावर काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *