जिला
अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करताना खासदार रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती
ता. लोहा (जि. नांदेड)– तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले असून, या नुकसानीची पाहणी करण्यासाठी खासदार रवींद्र चव्हाण यांनी प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ मदतीचे निर्देश दिले.
पाहणी दौऱ्यात माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास मोरे, काँग्रेस तालुकाध्यक्ष मधुकर पाटील दिघे, तहसीलदार विठ्ठल परळीकर, बाबुराव मोरे, वसंत पवार, सहायक कृषी अधिकारी संतोष सोनवळे, कृषी सहायक सौ. गच्चे, सौ. सुर्यवशी तसेच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या दौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी मांडत शासनाकडून त्वरीत पंचनामे करून आर्थिक मदतीची मागणी केली. पाहणीदरम्यान छायाचित्र विनोद महाबळे.



