क्राईम

सोनखेड पोलीसांची धडाकेबाज कामगिरी : २४ तासांत खुनाचा गुन्हा उघड, आरोपी जेरबंद

 

नांदेड जिल्ह्यातील सोनखेड पोलीसांनी केवळ २४ तासांच्या आत खुनाचा गुन्हा उघड करत आरोपीला जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.

आरोपी सचिन वसंत देशमुख (हंबर्डे), वय २७ वर्षे, व्यवसाय – शेती, रा. किवळा, ता. लोहा, जि. नांदेड.

अभिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी खुन, घरफोडी, जबरी चोरीसह गंभीर गुन्हे उघड करून आरोपींवर तात्काळ अटकेची कारवाई करण्याचे आदेश सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना दिले होते.

त्या अनुषंगाने दि. २६ सप्टेंबर २०२५ रोजी तक्रारदारांनी सोनखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की, त्यांचा मुलगा श्याम वसंत देशमुख (हंबर्डे), वय २६ वर्षे, याचा अज्ञात इसमाने खून केला आहे. त्यानुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

सपोनि श्री. पांडुरंग माने यांनी तपास पथक तयार करून तातडीने काम सुरू केले. तपासादरम्यान माहिती मिळाली की मयताचा मोठा भाऊ सचिन देशमुख याने संभाजीनगरला गाडी चालविण्यासाठी गेल्याचे सांगितले होते. मात्र त्याच्या मोबाईलचे लोकेशन व सीडीआर तपासले असता तो संभाजीनगरला गेला नसल्याचे निष्पन्न झाले.

त्यामुळे संशयावरून सचिन देशमुख यास ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली असता, त्याने कबुली दिली की दि. २६ सप्टेंबर रोजी पहाटे सुमारास मयत श्याम देशमुख याने आईला मारहाण केल्यामुळे रागाच्या भरात सचिन देशमुख याने राहत्या घरातच चाकूने वार करून त्याचा खून केला.

 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *