जिला

नांदेड जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचेही होणार भूमीपूजन

नांदेड,  दि. 22 :- बिलोली येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय नूतन इमारतीचे उद्घाटन व नांदेड जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन भगवंतराव सुर्यवंशी यांच्या हस्ते शनिवार 25 फेब्रुवारी रोजी होत आहे. बिलोली येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय नूतन इमारतीचे उद्घाटन सकाळी 11 वा. न्यायालय संकुल, बिलोली येथे संपन्न होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा न्यायाधीश नागेश वि. न्हावकर राहणार आहेत. बिलोली अभिवक्ता संघाचे अध्यक्ष ॲड. शिवकुमार नागनाथराव पाटील, बिलोली येथील जिल्हा न्यायाधीश-1 दिनेश ए. कोठलीकर यांची उपस्थिती राहील. बिलोली येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या या नूतन इमारत बांधकामाचे क्षेत्रफळ 1912.91 स्के. मी. आहे.
याचबरोबर नांदेड येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन भगवंतराव सुर्यवंशी यांच्या हस्ते होणार आहे. हा समारंभ शनिवार 25 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 4.30 वा. मामा चौक, कौठा नांदेड येथे संपन्न होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा न्यायाधीश नागेश वि. न्हावकर राहणार आहेत. जिल्हा न्यायाधीश-1 शशिकांत ए बांगर व अभिवक्ता संघाचे अध्यक्ष ॲड. सतीश मारुतीराव पुंड यांची यावेळी उपस्थिती राहील. जिल्हा व सत्र न्यायालयाची ही नूतन इमारत तळमजला व त्यावर सहा मजले याप्रमाणे आहे. या इमारतीचे एकूण क्षेत्रफळ 26515.56 चौ.मी असे आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *