नांदेड पोलीस दलाकडून आयोजित ” रन फॉर युनिटीस ” नांदेडकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद..

देशाच्या अखंडतेचे प्रतीक लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती निमित्त नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने रन फॉर युनिटी या विशेष रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शौर्य सेवा आणि एकतेचा संदेश देणारी रॅली दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी 08.30. वाजता भव्य स्वरूपात पार पडली.
सदर रॅली सकाळी 06.30 वाजता जुना मोंढा टावर महाविर चौक-वजिराबाद चौक पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड या मार्गे काढण्यात आली. सदर रॅलीची सुरूवात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस मान्यवरांचे हस्ते पुष्पहार अर्पण मा.श्री. राहूल कर्डिले, जिल्हाधिकारी नांदेड, मा.श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, मा.श्री. डॉ. मनोहर चासकर, कुलगुरू स्वारातिवि नांदेड, मा.श्रीमती मेघना कावली, मुख्य कार्यकारी अधिकारी नांदेड, मा.श्री. महेश डोईफोडे, महानगर पालिका आयुक्त नांदेड यांनी हिरवी झेंडी दाखवून करण्यात आली रॅली दरम्यान सहभागी लोकांनी एक भारत श्रेष्ठ भारत, एकतेतच शक्ती आहे, देश एक जन एक अशा घोषणा देत शहरात एकतेचा संदेश दिला.
या प्रसंगी आयोजकांनी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याचा आणि राष्ट्रीय ऐक्याच्या विचारांचा गौरवपूर्वक उल्लेख केला. राष्ट्रीय एकतेच्या या पवित्र यात्रेत पाऊल टाकुन भारताची शक्ती एकतेत आहे हे या ठिकाणी दर्शविण्यात आले.
रॅलीमध्ये सहभागींच्या हातात तिरंगा व मुखी एकच घोषवाक्य होते राष्ट्रीय एकतेसाठी धावुया. या रॅलीत नागरिकांना एकतेचा सामूहिक जबाबदारीचा आणि देशहिताचा संदेश देण्यात आला सरदार पटेलांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन पोलीस दल आणि समाज यांच्यातील बांधिलकी अधिक दृढ करण्याचे हे एक प्रतीकात्मक पाऊल ठरणार आहे.
सदर रॅलीतील विषेश बाब म्हणजे हिंदु, मुस्लीम, शिख, इसाई, बौध्द अशा विविध धर्माच्या धर्मगुरूंनी सहभाग घेवून सर्व धर्म समभाव आणि एकतेचा संदेश समाजास दिला. सदर रॅलीची सांगता पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड येथे राष्ट्रगीताने करण्यात आली.
सदर रॅलीमध्ये मा.श्री. राहूल कर्डिले, जिल्हाधिकारी नांदेड, मा.श्री.डॉ. मनोहर चासकर, कुलगुरू स्वारातिवि नांदेड, मा.श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड. मा.श्रीमती मेघना कावली, मुख्य कार्यकारी अधिकारी नांदेड, मा.श्री. महेश डोईफोडे, महानगर पालिका आयुक्त नांदेड, मा.श्री सुधीर देशमुख, अधिष्टता शंकरराव चव्हान शासकीय दवाखाना नांदेड, मा.श्री. अमर राजुरकर,
माजी आमदार, मा. श्रीमती अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक नांदेड, मा.श्री रामेश्वर वेंजने, उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेड शहर, विविध धर्मांचे धर्मगुरू, नांदेड जिल्हयातील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार, शाळा, कॉलेज, कोचिंग क्लासेस विदयार्थी, एन.सी.सी. कैंडिडेट पोलीस भरती पुर्व प्रशिक्षणार्थी व नांदेड जिल्हयातील नागरीक असे जवळपास 5,000 जनांनी मोठया उत्साहात सहभाग घेतला. सदर रॅली संपन्न झाल्यानंतर रॅलीत सहभाग घेणा-या सर्व मान्यवर, धर्मगुरू, विदयार्थी व नागरीकांचे मा.श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, यांनी पोलीस प्रशासणातर्फे आभार मानले आहे



