क्राईम

“रायवाडीत 68 किलो गांजा जप्त – स्थानिक गुन्हे शाखेची कार्रवाई”

नांदेड : स्थानिक गुन्हे शाखा नांदेडच्या पथकाने रायवाडी (ता. लोहा) परिसरात मोठी कारवाई करत अवैध गांजाची शेती उध्वस्त केली. या कारवाईत तब्बल 68 किलो 340 ग्रॅम वजनाचा, किंमत अंदाजे 6,83,400 रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. आरोपी नामदेव माणीका मोरे (वय 60, व्यवसाय शेती, रा. रायवाडी ता. लोहा, जि. नांदेड) याला ताब्यात घेण्यात आले आहे.

घटनेचा तपशील : पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, पोलीस उपनिरीक्षक महेश कोरे व त्यांच्या पथकातील अंमलदार कंधार उपविभागात गस्त घालत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली.

गुप्त माहितीनुसार आरोपी नामदेव मोरे हा आपल्या कापसाच्या शेतात गांजाची झाडे लावून त्याची विक्रीसाठी शेती करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यावर पथकाने तत्काळ छापा टाकला. छाप्यात अंदाजे 50 ते 60 गांजाच्या झाडांच्या फांद्या कापून विक्रीसाठी ठेवलेल्या अवस्थेत मिळून आल्या. पंचा समक्ष सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पुढील कारवाई : आरोपीविरुद्ध लोहा पोलीस ठाण्यात NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *