जिला

जिल्हा परिषदेत संविधान दिन उत्साहात साजरा; नागरी शिस्त ही सामूहिक जबाबदारी- भार्गवी मुंढे

 

नांदेड,26- नागरी शिस्त राखण्याची जबाबदारी ही व्यक्ती, संस्था आणि प्रशासन या तिघांचीही संयुक्त आहे. सामूहिक जबाबदारीनेच समाज प्रगतिपथावर चालू शकतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फेलो भार्गवी मुंढे यांनी केले.

नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने आज यशवंतराव चव्हाण सभागृहात संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी. बी. गिरी, समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, मुख्यमंत्री फेलो भार्गवी मुंढे, जिल्हा कृषी अधिकारी डॉ. नीलकुमार ऐतवडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, नियोजन शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे, लेखाधिकारी निळकंठ पाचंगे, उपशिक्षणाधिकारी अवधूत गुंजेवार आदींची उपस्थिती होती.

मुंढे यांनी विविध राज्यांचे उदाहरण देत नागरी शिस्त व संविधानिक मूल्यांवर विवेचन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखविलेल्या मार्गाने सामूहिक जबाबदारी स्विकारली तर विकासाचा मार्ग सर्वांसाठी प्रशस्त होतो, असे त्या म्हणाल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार यांनी केले. त्यांनी संविधान दिनाचे महत्त्व स्पष्ट करत 26 नोव्हेंबर ते 26 जानेवारी 2026 या कालावधीत घर-घर संविधान उपक्रमांतर्गत प्रत्येक घरापर्यंत संविधान उद्देशिका पोहोचविण्यात येणार असल्याची माहिती दिली. प्रारंभी मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सभागृहातील सर्वांनी भारताच्या संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी मिलिंद व्यवहारे यांनी केले. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे कर्मचारी रणजीत गजभारे यांच्या वतीने लाडूंचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे स्वीय सहाय्यक बालाजी नागमवाड, शुभम तेलेवार, शशिकांत गोले, गंगाधर माचनवाड, विजय वाघमारे, रणजीत गजभारे, सोपान खिल्लारे, राजेश जोंधळे, साईचरण मुगावे, शिवसांब चेडू, गजेंद्र श्रीरामवार, कुलदीप जोशी, बालाजी आवर्दे उज्ज्वला गजभारे, शालिनी शेळके, प्रतिभा चोळाखेकर, वैशाली थोरात, मोहिनी जाधव, स्नेहल वळसे, पूजा सोनटक्के, सुरज नाईक, राजेश तावडे, अशोक पंडित आदींसह जिल्हा परिषदेचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *