मराठवाडा

डीआरएम श्री प्रदीप कामले यांनी मानवत रोड – सेलु – परतूर – रोटेगाव – नागरसोल दरम्यान विकासकामांची पाहणी केली

 

आज दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी नांदेड विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री. प्रदीप कामले यांनी विशेष निरीक्षण दौऱ्यात मानवत रोड, सेलु, परतूर, रोटेगाव आणि नागरसोल या स्थानकांवरील अमृत स्टेशन अंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांची सविस्तर पाहणी केली.

दौर्‍यात स्टेशन उन्नयन, प्रवाशी सुविधा वाढविणे, स्वच्छता, सर्क्युलेशन एरिया, वेटिंग हॉल, प्लॅटफॉर्म सुधारणा तसेच मूलभूत सुविधांवरील प्रगतीचा आढावा घेण्यात आला.

मानवत रोड – सेलू – परतूर – रोटेगाव – नागरसोल या अमृत स्टेशन स्थानकांवरील कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. सुरु असलेल्या विकास कार्याचा आढावा घेण्यात आला , संबंधीत अधिकारी यांना उपयुक्त सूचना देण्यात आल्या.

तसेच या दौऱ्यात परभणी – नागरसोल दरम्यान रिअर विंडो इन्स्पेक्शन करण्यात आले. ज्यात श्री कामले यांनी परभणी –नागरसोल दरम्यान असलेल्या विविध रेल्वे फाटक, सिग्नल पोस्ट, रेल्वे पटरी तसेच इतर सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या संसाधनांची पाहणी केली.

नागरसोल – तारूर स्थानकांदरम्यान किमी 31/15–32/1 वरील रेल्वे फाटक क्रमांक -13 ऐवजी रेल्वे भुयारी पुलाचे बांधकाम सुरु आहे, या रेल्वे कार्याची त्यांनी पाहणी केली.

या पाहणी दौऱ्यात श्री कामले यांच्या सोबत अभियांत्रिकी विभागाचे, परिचालन विभागाचे, विद्युत विभागाचे, तसेच वाणिज्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

नांदेड रेल्वे विभागातर्फे विनंती : प्रवाशांनी रेल्वे परिसरात सुरक्षा नियमांचे पालन करावे, अनधिकृत मार्गाने ट्रॅक ओलांडू नये. विनातिकीट प्रवास करू नये, रेल्वे प्रशासनाकडून उभारल्या जाणाऱ्या सुविधा व विकासकामांसाठी नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *