सक्षम ताटे खून प्रकरणातील फरार दोन्ही आरोपी 12 तासांत अटक स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी


नांदेड – इतवारा पोलीस स्टेशन हद्दीतील सक्षम गौतम ताटे यांच्या खून प्रकरणात फरार असलेले दोन्ही आरोपी फक्त 12 तासांत जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. नांदेडचे पोलीस अधीक्षक मा. श्री. अभिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
अटक केलेले आरोपी गजानन बालाजीराव मामीडवार, वय 45 वर्षे, साहिल मदनसिंह ठाकुर उर्फ साहिल गजानन मामीडवार, वय 25 वर्षे (दोघे रा. सिद्धनाथपुरी, चौफाळा, नांदेड) मृतक सक्षम गौतम ताटे, रा. संघसेन नगर, मच्छीमार्केट, इतवारा, नांदेड
27/11/2025 रोजी फिर्यादीच्या मुलगा सक्षम ताटे याचा दोन्ही आरोपींनी त्यांच्या मुलीसोबत बोलतो या संशयावरून कट रचला. गैरकायद्याची मंडळी जमवून त्यांनी सक्षमला अग्निशस्त्राने गोळी मारून, तसेच फरशीचा तुकडा डोक्यात मारून ठार केले.
या प्रकरणी इतवारा पोलीस स्टेशनमध्ये, गु.र. नं. 360/2025 कलम 103, 61(2), 189, 190, 191(2)(3) भा.न्या.सं., कलम 3(2)(5), 3(2)(V) अ.जा.जा.प्र.का. आणि भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांना आरोपी शोधण्याचे आदेश दिल्यानंतर दोन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली.
तपासादरम्यान सपोनि. विठ्ठल घोगरे, पोउपनि. नागनाथ तुकडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून आरोपी मानवत (जि. परभणी) येथे नातेवाईकांकडे लपल्याचा सुगावा मिळाला.
पथकाने तात्काळ गोलाईतनगर, मानवत येथे धाड टाकून दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. विचारपूस करताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींना रिपोर्टसह पुढील कारवाईसाठी इतवारा पोलीसांच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आले.



